एखाद्याची पत्रिका वा हात पाहून ज्योतिषाने भावी आयुष्यातील एखाद्या घटनेची दाट शक्यता सांगितली म्हणजेच केवळ ’भविष्य’ नव्हे. तर वर्तमान काळातील एखादी अज्ञात असलेली गोष्ट जरी सूचित केली तरी ते ’भविष्य’म्हणूनच गणले जाते. एवढच कशाला भूतकाळातील एखादी घटना जरी त्याने शक्यता या प्रांतात सूचित केली तरीही ते ’भविष्य’.म्हणजे भविष्य हा शब्द केवळ कालवाचक नाही तर तो अज्ञाताचा घेतलेला कुठल्याही मार्गाने घेतलेला कालातीत शोध असा आहे. त्याला चिकटलेली आश्चर्य, अदभूत, गूढ अशी गुणवाचक वैशिष्ट्ये भविष्य या विषयाचे आकर्षण वाढवतात. आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलय याच एकीकडे भय ही असते तर दुसरी कडे आकर्षण ही असते. भविष्यकाळाविषयी सुखद स्वप्ने रंगवणे हा एक मानवी मनाचा खेळ असतो. त्यामुळे जगात बरेचसे व्यवसाय ’भय’ आणि ’स्वप्न’ यावरच चालतात. वैद्यकीय क्षेत्रात आजारी पडण्याचे भय व बरे होण्याचे स्वप्न दाखवून आरोग्य पुरवण्या ’प्रबोधनाचे’ तथा ’जागरुकतेचे’ काम करतात. बिल्डर घराचे स्वप्न दाखवतो. पोलिस,वकील कायद्याचे भय दाखवतात. बॉलिवूड तर अनेकांना हिरो हिरॉईन बनण्याचे स्वप्न दाखवते. लठ्ठ स्त्रियांना झिरो फिगर करण्याचे स्वप्न व सडपातळ स्त्रियांना लठ्ठ होण्याचे भय दाखवून देखील ब्युटी, डाएट, जिम इंडस्ट्रीज चालतात. ज्योतिषात ही तशा प्रकारचे लोक आहेत. कालसर्प योगाचे भय दाखवून नारायण नागबली विधी करायला लावणारे भरपूर पैसे उकळणारे लोक आहेतच. त्याचबरोबर काळजी करु नका कुलदेवतेच स्मरण करा व आपली सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा असे सांगून धीर देणारे ज्योतिषी देखील आहेत. ग्रहपीडेचे भय आणि परिहार वा तोडगा काढून त्याचे निवारण केल्याने चांगले दिवस येतील हे स्वप्न दाखवून जातकाला दिलासा दिला तर त्यालाही लुबाडल्यासारखे वाटत नाही हे धूर्त व चाणाक्ष ज्योतिषांना माहित असते.
Friday, March 26, 2021
Monday, March 16, 2020
डॉ. ह वि सरदेसाई
डॉ ह. वि सरदेसाईं गेले. त्यांच्या स्मृती जागृत झाल्या. त्यांचे लेख, व्याखाने मी ऐकायचो. त्यांच्या एका लेखात जवळपास 70 टक्के आजार हे सायकोसोमॅटिक असतात असे एक विवेचेन होते. मला जरा विचित्र वाटल. जरा फारच होतय नाही? असे वाटून गेले. नंतर यांचे फलज्योतिष विषयासंबंधी काय विचार आहेत हे जरा समजून घ्यावेत म्हणुन मी त्यांच्याकडे साधारण 2016 च्या दरम्यान गेलो होतो. त्यांच्या कमला नेहरु पार्कजवळील क्लिनिक वर गेलो. काउंटरवर सांगितले कि मी रुग्ण म्हणून आलेलो नाही. मला सामाजिक विषयासंदर्भात त्यांची भेट घ्यायची आहे. मला काउंटर वर सांगितले की सध्या ते वृद्धापकाळ व प्रकृतीअस्वास्थ्यामुळे या विषयापासून दूर आहेत. कार्यक्रमांना जात नाहीत. मी म्हणालो त्यांच्याशी चर्चा करायची आहे. त्यांनी नाही म्हणून सांगितले. मग म्हणल ठिक आहे. ही पुस्तके त्यांना वाचायला द्या असे म्हणून माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद व यंदा कर्तव्य आहे अशी दोन पुस्तके व डॊ जयंत नारळीकरांनी लिहिलेले ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... चे लोकसत्तातील तेव्हाचे परिक्षण असे दिले. माझे कार्डही दिले. नंतर मी माझ्या रुटीनला लागलो. चार पाच दिवसांनी मला त्यांच्या स्वागतकाचा फोन आला. डॉ. तुम्हाला भेटू इच्छितात. सकाळी दहा वाजता या. मला आनंद वाटला. मी लगेच गेलो. त्यांनी स्वागत केल. तुमची दोन्ही पुस्तके व्यवस्थित वाचलीत असे सांगितले. पुस्तके आवडल्याचे सांगितले तसेच तुमच्या विवेचनाशी सहमत असल्याचेही सांगितले. मग अनौपचारिक व ऐसपैस गप्पा झाल्या. मी ज्योतिशातले काही वैद्यकशास्त्रा संबंधी किस्से सांगितले. मग मी तो सायकोसोमॅटिकवाला विषय हळूच काढला. मला स्वत:ला IBS ( irritable bowel syndrome) चा त्रास डिटेक्ट झाला असल्याचे सांगितले. या IBS वर त्यांचा फॅमिली डॉक्टर पुरवणीत त्यांचा लेख आला होता. त्या त्रासात सायकोसोमॆटिक भाग आहे. हे त्या लेखातही होते. मी त्याविषयी विचारले. तुमच्या विवेचनात 70 टक्के भाग सायकोसोमॅटिक चा उल्लेख असतो. ते म्हणाले कि माझ्याकडे इतक्या वर्षात जे पेशंट आले त्यावरुन मी हे सांगतो. प्रत्यक्षात हे प्रमाण त्याही पेक्षा जास्त आहे. मनाचा व शरीराचा फार जवळचा व गुंतागुंतीचा संबंध आहे.आपल्याला त्याचे सगळेच आकलन झाले आहे असे अजिबात नाही. आम्ही पेशंटला फक्त बर व्हायला मदत करतो. त्याचा तोच बरा होत असतो. अनेक मनोकायिक आजारात प्लासिबो परिणाम होत असताना दिसतो. काही आजार निश्चित असे आहेत की जिथे औषधांचाच परिणाम होतो. आणि कारणही मनोकायिक नसतात. पण असे त्यामानाने फार कमी. मी म्हणालो औषधं जान्हवी तोयं। धन्वंतरी म्हणुन रोग्याचा असलेला विश्वास महत्वाचा आहेच. हल्ली डॉक्टर पेशंट नात बदलतयं. मग गाडी परत ज्योतिषावर आणली. त्यांना तो मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या कुंडल्यांविषयी आम्ही केलेला प्रयोग सविस्तर सांगितला. त्यांना प्रयोगाचे कौतुक वाटले त्यांनी पेपर मधे साधारणपणे तो वाचला होता.मी त्यांना म्हटल कि अंनिसचे ज्योतिषांना आव्हान हे नेहमीच आहे. पण हा प्रयोग आम्ही आवाहन या पातळीवर केला. आव्हानात दंभ उन्मादाचा वास येवू शकतो. आवाहनात ’आपण’ असा एक मृदू भाग असतो. मग मी त्यांना माझा फलज्योतिषविषयक प्रवास सांगितला. फलजोतिषाविषयी असलेला एक मृदूकोपरा त्यांना भावला. कदाचित याच कारणामुळे त्यांची माझी ही अनौपचारिक ऐसपैस भेट झाली असावी. नंतर आम्ही परस्परांचा निरोप घेतला त्यांची माझी ती पहिली व शेवटची भेट.
Monday, April 01, 2019
नरेंद्र मोदींची खरी जन्मकुंडली कोणती?
मूळात नरेंद्र मोदींची खरी जन्मतारीख कुणालाच माहित नाही. निवडणुक आयोगाकडे असलेल्या कागदपत्रानुसार ती आहे 17 सप्टेंबर 1950. पुढे जन्म ठिकाण वीसनगर, गुजरात सकाळी 11 वाजता ही जन्मकुंडली तयार करण्यासाठी लागणारी अतिरिक्त माहिती. बहुसंख्य ज्योतिषी ही माहिती खरी आहे असे गृहीत धरुन जन्मपत्रिका तयार करतात. त्यानुसार त्यांची राशी व लग्न दोन्ही येते वृश्चिक. आता त्यांची दुसरी जन्मतारीख आहे 29 ऑगस्ट 1949 सकाळी 6 वाजता. ही आहे त्यांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट वरील तारीख. बीबीसी ने दिलेल्या माहिती नुसार निवडणुक आयोगाला जी माहिती दिली आहे त्या नुसार मोदींनी 1967 साली एसएससी परिक्षा उत्तीर्ण केली, त्यानंतर 1978 मधे दिल्ली विश्वविद्यालयातून बीए उत्तीर्ण केले नंतर 1983 मधे गुजराथ युनिवर्सिटीतून एम ए राज्यशास्त्र केले. परंतु अजुन कोणी त्यांचे सर्टिफिकेट पाहू शकला नाही. अर्थात त्याने काही फरक पडत नाही ही गोष्ट वेगळी. त्यांच्या 29 ऑगस्ट च्या जन्मतारखे नुसार त्यांची रास येते तूळ व लग्न येते सिंह. वाय सी शुक्ल या ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार दोन्ही पत्रिकेचा अभ्यास करुन अधिकृत जन्मतारखेनुसार येणार्या कुंडली पेक्षा त्यांची दुसरी जन्मतारीख 29 ऑगस्ट नुसार येणारी कुंडली ही अधिक योग्य वाटत आहे. ज्योतिषात याला अनुमानित पत्रिका म्हणतात. म्हणजे ताळा पद्धतीने आताची जातकाची वैशिष्ट्ये, वर्तमान व जन्मपत्रिका यांची सांगड घालून ठरवणे.
खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, जत्रच्या टायमाला, ऐतवार व्हता तव्हा, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" सवसांच्या टायमाला अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते. जन्मवेळ तर सोडाच पण जन्मतारखेच्या नोंदी सुद्धा जिथ विश्वासार्ह मिळणे अवघड तिथे ज्योतिषाचा मूलभूत आधार व हत्यार असलेल्या जन्मकुंडलीची विश्वासार्हता काय असणार आहे? मग अशावेळी अशा जन्मकुंडलीच्या आधारे भविष्य सांगणे याला काही अर्थ आहे का? असो! आमचे रिसबूड म्हणायचे बंडूचा हातचा चुकला तरी बंडूच गणित कस काय बरोबर येत?
खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, जत्रच्या टायमाला, ऐतवार व्हता तव्हा, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" सवसांच्या टायमाला अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते. जन्मवेळ तर सोडाच पण जन्मतारखेच्या नोंदी सुद्धा जिथ विश्वासार्ह मिळणे अवघड तिथे ज्योतिषाचा मूलभूत आधार व हत्यार असलेल्या जन्मकुंडलीची विश्वासार्हता काय असणार आहे? मग अशावेळी अशा जन्मकुंडलीच्या आधारे भविष्य सांगणे याला काही अर्थ आहे का? असो! आमचे रिसबूड म्हणायचे बंडूचा हातचा चुकला तरी बंडूच गणित कस काय बरोबर येत?
Thursday, October 18, 2018
बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै मा.श्री. रिसबूड
सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड
यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक
होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण
पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण
पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.
बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये
-मा.श्री रिसबूड
भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत.माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तहेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते.मी है। का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतो :
बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये
-मा.श्री रिसबूड
भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत.माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते.मग तो दुसया तहेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपते करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते.मी है। का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतो :
Friday, July 21, 2017
कुंडली एका नरेंद्राची
फेब्रुवारी २०१२ मधे मला डॉ दाभोलकरांचा फोन आला. "दैववादाची होळी हा अंनिसचा कुंडली जाळण्याचा कार्यक्रम आहे. मला माझी कुंडली कार्यक्रमात जाळायची आहे. मला कुंडली तयार करुन पाठव."
" ठीक आहे द्या तुमची जन्मवेळ जन्मतारीख, जन्मस्थळ."
"ही घे १ नोव्हेंबर १९४५ सातारा सकाळी ७ वाजता."
" ठीक आहे पाठवतो."
" ठीक आहे द्या तुमची जन्मवेळ जन्मतारीख, जन्मस्थळ."
"ही घे १ नोव्हेंबर १९४५ सातारा सकाळी ७ वाजता."
" ठीक आहे पाठवतो."
Sunday, March 26, 2017
गोरज मुहुर्त
माझे मित्र पराग दिवेकर गुरुजी हे गेली अनेक वर्षे पौराहित्य करतात. विवाह सारख्या विधींमधे येणार्या व्यावहारिक अडचणी त्यांना चांगल्या परिचित आहेत. त्यांनी पारंपारिक धार्मिक विधिंना आधुनिक लग्नविधीपद्धतीत सामावून घेतले आहे.ज्ञानप्रबोधीनी देखील आता याच प्रकारचा मॉडिफाइड लग्नविधी करत आहे. गोरज मुहुर्त हा सायंकाळी सुर्यास्ताच्या आसपास असतो. गायी संध्याकाळी परत गोठ्याकडे येण्याची वेळ म्हणजे गोरज. आता गायी शहरात नसल्या तरी ती वेळ आधुनिक जीवन शैली ला अत्यंत सुसंगत आहे. पण हा मुहुर्त केवळ ब्राह्मणेतरांमधे विशेष वापरात आहे. खर तर तो सर्वांना सोयीचा आहे. शास्त्रात तो ब्राह्मणांनी वापरुच नये असे कुठे म्हटले नाही. पण केवळ लोकसमूहाची परंपरा म्ह्णून तो ब्राहमणात वापरत नाहीत. अलिकडे अनेक उच्चभ्रू ब्राह्मण समाजात तो वापरात येत आहे. विशेषत; लॉन्स मधे सायंकाळ ही लग्नाची खूप सोयीची वेळ असते. लग्न व रिसेप्शन एकत्र असे मोठे फंक्शन करण्याचा प्रघात पडू लागला आहे. पंचांगातील रेडिमेड मुहुर्त हे रेडिमेड कपड्यांसारखे असतात तर काढीव मुहुर्त हे टेलरमेड कपड्यांसारखे असतात. माझ्या यंदा कर्तव्य आहे या पुस्तकात याची सविस्तर चर्चा आहेच.
Friday, March 25, 2016
मनोविकार तज्ञ व मनोविकारांचा मागोवा चे लेखक डॉ. श्रीकांत जोशी यांचे ई पत्र
Dear Prakash
First of all, let me thank you for the kind words you
said about this book which unfortunately did not get the attention it
deserved looking at the importance of this subject. It is still good to
know that there are people who have thought about it.
Secondly, let me apologise for replying in English. This is due to the fact, that I can not type in Marathi.
Your
efforts at throwing sunlight on to the subject of PhalJyotish are
commendable. It is unfortunate, that even today, millions depend on this
completely unscientific method to decide about their life.
Shraddha,
or its twin Andhashraddha are far too deeply embedded in our culture,
and many other cultures around the world. The persistence of such
completely irrational thoughts and practices even amongst people who are
otherwise rational and practical in other areas of life, means that
these irrational thoughts serve some functions. Amongst the many
challenges of life, a challenge to live with uncertainty is a major one
for many people.
Future course of events are predictable
grossly in macro events, in the sense what will happen to environment
etc, it is nearly impossible to accurately predict what will happen in
any person's life.Though by far and large, most people's lives are
routine and nothing new happens most of the times, there are some
unexpected events. The other issue is while making an important life
changing decision like choosing a life partner or accepting a job offer,
most people want to peep into the future, they want to have as many
factors as possible which will in their opinion help them to make a
decision which provides best outcome for them.
Jyotish offers
future predictions, based on a process which appears very scientific,
like the position of stars and a deep study etc. People fall for such
pseudo scientific mumbo jumbo, as they want to be convinced that they
have an advance warning.
An emotional need to make future
predictable and secure leads people to irrational thoughts and beliefs.
When emotions are involved, rationality takes a backseat. It becomes
nearly impossible to convince such people and argue with them.
Urbanization,
modernization, globalization, splitting of family into smaller units,
are some factors which may loosen the grip of such irrational beliefs on
the common man. But even in that the success of many modern Gurus show
that people do have dependency needs which need fulfillment.
A
lot can be said about this, but I was happy to read your comments, and
feel free to translate my opinions about the same on your sites and
facebook if you feel so.
Warm Regards
Shreekant JoshiTuesday, March 22, 2016
औषध उतारे आणि आशीर्वाद
मंत्रतंत्र बाबा बुवा ज्योतिष च्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशीर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच. डॉ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच."
Tuesday, February 23, 2016
मुहूर्त
मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती.
Saturday, August 15, 2015
ज्योतिषी प्रा. रमणलाल शहा
जेष्ठ ज्योतिषी प्रा. रमणलाल शहा म्हणतात,"ज्योतिषाच्या संदर्भात अगदी काही मोजक्या व्यक्तिंचे या शास्त्राच्या प्रचीतीबद्दलचे व हे मुळात शास्त्रच आहे का? याबद्दलची शंका असते. परंतु मी अनेकवेळा विविध ठिकाणी सांगत आलो आहे ज्यांचा ज्योतिषावर विश्वास नाही त्यांना हे शास्त्र बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करु नका. अट्टाहास करु नका."
संदर्भ- ग्रहांकित ऑगस्ट २०१५
अगदी खरं आहे. पण हेच उलट बाजूने ही म्हणता येईल. बहुतांशी लोकांचे या शास्त्राबाबत शंका नसते.काहींची तर ठाम श्रद्धा असते. चुकला तर ज्योतिषी चुकू शकतो पण ज्योतिष शास्त्र नेहमीच बरोबर असते.ज्यांचा अढळ विश्वास आहे त्यांना हे शास्त्र थोतांड आहे सांगण्याचा अट्टाहास करु नका.
संदर्भ- ग्रहांकित ऑगस्ट २०१५
अगदी खरं आहे. पण हेच उलट बाजूने ही म्हणता येईल. बहुतांशी लोकांचे या शास्त्राबाबत शंका नसते.काहींची तर ठाम श्रद्धा असते. चुकला तर ज्योतिषी चुकू शकतो पण ज्योतिष शास्त्र नेहमीच बरोबर असते.ज्यांचा अढळ विश्वास आहे त्यांना हे शास्त्र थोतांड आहे सांगण्याचा अट्टाहास करु नका.
Friday, January 02, 2015
आत्मानंद यांचे फलज्योतिषाला आव्हान!
फलज्योतिषाला आव्हान म्हटले की लोकांना डोळ्यासमोर अंनिस दिसते. पण अमृततुषार या आत्मानंद यांनी १९६७ साली लिहिलेल्या पुस्तकात फलज्योतिष हे शास्त्र आहे का? या प्रकरणात त्यांनी फलज्योतिषाला एक आव्हान दिले होते. ते म्हणतात," ह्या लेखातील विधानांस या शास्त्राच्या अभिमान्यांनी सविस्तर उत्तर तर द्यावेच परंतु त्या्च्या अगोदर त्या सर्वांना माझे असे आव्हान आहे की मी एक तंतोतंत अंशात्मक अशी कुंडली
Thursday, January 01, 2015
आत्मानंद यांची ज्योतिषविषयक काही मते
आत्मानंद हे अध्यात्मिक क्षेत्रात गति असणारे गृहस्थ. त्यांचे खरे नांव गणपत हिरालाल भावसार ( B.A, LLB ) जन्म:१९०० मृत्यू: १९७९ त्यांची अमृततुषार, अज्ञाताचा शोध व बोध, वैतरणेच्या ऐलतीरी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. अमृततुषार मधे त्यांचे फलज्योतिष हे शास्त्र आहे काय? व नाडीग्रंथावरील अभिप्राय ही दोन प्रकरणे फलज्योतिष व नाडीग्रंथावर टीका व आत्मपरिक्षण करावयास लावणारी आहेत. ती मूळातूनच वाचण्यासारखी आहेत. इतर गूढ विषयावरील त्यांची काही मते विज्ञानवादी लोकांना मान्य होणार नाहीत. त्यांच्या अज्ञाताचा शोध व बोध या पुस्तकात भविष्यकालीन घटना व त्याचे ज्ञान. नावाचे एक प्रकरण आहे. त्यात ते म्हणतात.
"..यापैकी ज्योतिषासंबंधी सांगायचे म्हटले तर ते शास्त्र खोटे आहे असे म्हणण्यापेक्षा
"..यापैकी ज्योतिषासंबंधी सांगायचे म्हटले तर ते शास्त्र खोटे आहे असे म्हणण्यापेक्षा
Wednesday, November 26, 2014
स्मृती इराणी व ज्योतिष
मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी परवा आपल्या कुटुंबासोबत राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांच्या कडे ज्योतिष पहायला गेल्या व वाहिन्यांना सनसनाटी न्यूज मिळाली. तीन मराठी चॅनेलवर एकाच वेळी परिसंवाद चालू झाले.जणु काही त्या ज्योतिषाकडे गेल्यामुळे फलज्योतिषाला विज्ञानजगात मान्यताच मिळणार होती. पण
Wednesday, October 08, 2014
लोकसभा निवडणुकातील ज्योतिषांच्या भाकीताचे काय झालं?
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी ४ एप्रिल २०१४ रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार्या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष ऐसी अक्षरे वरील लेखक श्री प्रभाकर नानावटी यांनी तयार करुन खाली दिलेले आहेत.
Saturday, March 01, 2014
दाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य
ज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती पहा.कुठलीही राजकीय घटना या व्याप्तीत सहज बसवता येईल.
========================================================================
पंचांगाचे २०१४-१५ साल भारताच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. कारण ह्याच वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण आणि रवी शनी प्रतियोग होणार आहेत. हे सर्व ग्रहयोग भारताच्या मकर लग्नाच्या पत्रिकेत दशम स्थान व चतुर्थ स्थानात होत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने राजकारण हा एक गूढ विषय झाला तर आश्चर्य नाही.
सत्तेवरील कॉंग्रेस पक्षाची पत्रिका मीन लग्नाची आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत शनीचे भ्रमण ह्या पत्रिकेत अष्टमस्थानातून होईल. फेब्रुवारी १४ मधे मंगळ याच स्थानात हजेरी लावेल आणि तेथुन तो वक्री मार्गी स्थितीमधे जवळ जवळ जुलै मध्यापर्यंत राहील. अर्थातच सत्ताधारी पक्षाला ही निवडणुक जिंकणे अतिशय जड जाईल. कॉंग्रेस पक्षाला आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी पुर्वी कधी नव्हती इतकी तडजोड करावी लागेल. श्रीमती सोनिया गांधी यांची पत्रिका कर्क लग्नाची आहे. त्यांचे पत्रिकेनुसार एप्रिल ते जुन १४ या कालावधीमधे गुरुचे व्ययस्थानात तर शनीचे भ्रमण चतुर्थस्थानात असल्यामुळे पक्षातील सदस्यांनी केलेल्या चुका त्यांना महागात पडतील.अर्थातच इतर पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल. पण कॉंग्रेस पक्षाची पत्रिका जुन नंतर बलवत्तर होत जाईल. कारण गुरु पक्षातील पत्रिकेत पंचम स्थानात आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेत लग्नस्थानात प्रवेश करेल. त्यानंतर कदाचित हीच कॉंग्रेस पार्टी नेतृत्व देउ शकेल.मात्र त्यापुर्वी पक्षाला अग्निपरिक्षेतून जावे लागणार हे निश्चित. हे सर्व ग्रहमान पाहता असे वाटते की सार्वत्रिक निवडणुकांमधे हा पक्ष सरळमार्गाने सत्तेवर येउ शकणार नाही. पण ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर या पक्षाचे पारडे जड होईल. दरम्यान च्या काळा मधे मध्यावधी निवडणुका पुन्हा घ्याव्या लागण्याची परिस्थिती निर्माण होईल.
पंचांगाचे २०१४-१५ साल भारताच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. कारण ह्याच वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण आणि रवी शनी प्रतियोग होणार आहेत. हे सर्व ग्रहयोग भारताच्या मकर लग्नाच्या पत्रिकेत दशम स्थान व चतुर्थ स्थानात होत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने राजकारण हा एक गूढ विषय झाला तर आश्चर्य नाही.
सत्तेवरील कॉंग्रेस पक्षाची पत्रिका मीन लग्नाची आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत शनीचे भ्रमण ह्या पत्रिकेत अष्टमस्थानातून होईल. फेब्रुवारी १४ मधे मंगळ याच स्थानात हजेरी लावेल आणि तेथुन तो वक्री मार्गी स्थितीमधे जवळ जवळ जुलै मध्यापर्यंत राहील. अर्थातच सत्ताधारी पक्षाला ही निवडणुक जिंकणे अतिशय जड जाईल. कॉंग्रेस पक्षाला आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी पुर्वी कधी नव्हती इतकी तडजोड करावी लागेल. श्रीमती सोनिया गांधी यांची पत्रिका कर्क लग्नाची आहे. त्यांचे पत्रिकेनुसार एप्रिल ते जुन १४ या कालावधीमधे गुरुचे व्ययस्थानात तर शनीचे भ्रमण चतुर्थस्थानात असल्यामुळे पक्षातील सदस्यांनी केलेल्या चुका त्यांना महागात पडतील.अर्थातच इतर पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल. पण कॉंग्रेस पक्षाची पत्रिका जुन नंतर बलवत्तर होत जाईल. कारण गुरु पक्षातील पत्रिकेत पंचम स्थानात आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेत लग्नस्थानात प्रवेश करेल. त्यानंतर कदाचित हीच कॉंग्रेस पार्टी नेतृत्व देउ शकेल.मात्र त्यापुर्वी पक्षाला अग्निपरिक्षेतून जावे लागणार हे निश्चित. हे सर्व ग्रहमान पाहता असे वाटते की सार्वत्रिक निवडणुकांमधे हा पक्ष सरळमार्गाने सत्तेवर येउ शकणार नाही. पण ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर या पक्षाचे पारडे जड होईल. दरम्यान च्या काळा मधे मध्यावधी निवडणुका पुन्हा घ्याव्या लागण्याची परिस्थिती निर्माण होईल.
Thursday, February 27, 2014
आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका!
आता २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.ज्योतिषांच्या भाकितांचे आता प्रमाण वाढू लागेल.उमेदवार आता ज्योतिषांचे सल्ले घ्यायला लागतील. मेदिनीय ज्योतिषाच्या आधारे ही राजकीय/निवडणुकीची भाकिते वर्तवली जातात.मेदिनीय ज्योतिष म्हणजे देश, प्रांत यांचे भवितव्य सांगणारी ज्योतिष शाखा. यात हवामान, राजकीय बदल, सामाजिक स्थित्यंतरे, सृष्टी-चमत्कार, क्रांती, भूकंप, युद्धे, दंगली इ. गोष्टींचा मागोवा घेतात. यात देश, प्रांत, शहर, राजकीय पक्ष यांना सुद्धा राशी बहाल केल्या आहेत. उदा. आधुनिक भारताची रास मकर आहे. आता ही सुद्धा कशी? १ नोव्हे.१८५८ रोजी इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीचे भारतावरील वर्चस्व संपून राणीच्या राजसत्तेचे वर्चस्व चालू झाले. या अर्थाने आधुनिक भारताचा जन्म झाला. मग अगोदर भारत नव्हता का? हा प्रश्न इथे निरर्थक आहे. भारताचे भाकीत वर्तवताना आधुनिक भारताची पत्रिका, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला म्हणून स्वतंत्र भारताची पत्रिका, २६ जाने १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला म्हणून ती पत्रिका, सत्तेवर असलेल्या पक्षाची पत्रिका, पंतप्रधानांची पत्रिका वगैरे अनेक पत्रिका विचारात घेवून भाकीत वर्तवले जाते. कॉंग्रेसची पत्रिका कुठली तर २८ डिसेंबर १८८५ म्हणजे पक्षस्थापनेची. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला कॉंग्रेसमध्ये विभाजन होत गेले तरी पत्रिका तीच. पोर्तुगीजांनी ब्रिटीशांना मुंबई बेट आंदण म्हणून दिले ती मुंबईची पत्रिका. असे प्रातांचे जन्म धरून त्यांच्या पत्रिका तयार केल्या आहेत. इंदिरा गांधी १९७७ ची निवडणूक हरल्या कारण त्यांनी अमावस्येला फॉर्म भरला होता असं अजंता जैन या राजकीय भाकीत वर्तवणाऱ्या ज्योतिषाने सांगितले होते. १९९१ च्या निवडणूका व राजीव गांधींची हत्या ही कोणालाही सांगता आली नाही. बहुसंख्य ज्योतिषांनी राजीव गांधींच पंतप्रधान होणार असे सांगितले होते. ( पहा साप्ताहिक सकाळ २७ एप्रिल १९९१. व इलस्ट्रेटेड विकली २५-३१ मे १९९१)
Monday, February 03, 2014
भविष्य कुठल्या कारणामुळे चुकते??
वर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर
मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्धास्थान' असलेल्या आदिनाथ साळवी सरांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्यच. जाहिरातीत भाकित खरे ठरल्याचा एखाद्या व्यक्तिचा अनुभव असतो. जर विवाह होणार असेल तर कुठे? कधी?कोणाशी? जोडीदाराचा स्वभाव कसा असेल? तो नोकरी का व्यवसाय करत असेल? त्याचे रंग रुप व्यक्तिमत्व आर्थिक परिस्थिती कशी असेल? विवाह नात्यात होईल का? प्रेमविवाह, पळून जाउन कि ठरवून? तो जातीचा असेल की परजातीचा? विवाहास जास्त खर्च तर येणार नाही ना? तो बिजवर व्यसनी नंपुसक, लफंगा तर नसेल ना? तो दीर्घायु आरोग्यसंपन्न आहे का? घरातील माणसांशी पटेल ना? ग्रहदोष दूर होउन वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी अत्यावश्यक धार्मिक उपाय, उपासना व प्रार्थना कोणती करावी? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात असतात. ते जाहीरातीत लिहिले असतात. जाहिरातीत हल्ली पुढे असेही लिहिले असते कि खालील कारणाने सांगितलेले भविष्य चुकीचे ठरु शकते
Monday, January 13, 2014
लपे करमाची रेखा
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला
बापा नको मारू थापा असो खर्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या
अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सांगे पंचागन
नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ
कवियत्री – बहिणाबाई चौधरी
पुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडली
देवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटला
धन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटला
बापा नको मारू थापा असो खर्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या
अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले
नशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यले
राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगन
त्यात आले रे नशीब काय सांगे पंचागन
नको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहू
माझ दैव माले कये माझ्या दारी नको येऊ
कवियत्री – बहिणाबाई चौधरी
Thursday, January 09, 2014
ज्योतिष ही अंधश्रद्धा - डॉ वेंकटरामन
'भारत विकासाच्या वाटेवर जात असताना नशिबावर विश्वास ठेवत जातो. सरकार, राजकारणी याच विचारसरणीला पाठबळ देत आहेत, हे दुदैवच म्हणावे लागेल. ज्योतिषशास्त्राचा आधार घेत भविष्य वर्तविण्यात येते. ज्योतिषशास्त्र ही केवळ अंधश्रद्धा आहे. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याने ते शास्त्रही नाही,'' असे मत "नोबेल'विजेते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. वेंकटरामन रामकृष्णन यांनी पुणे येथ व्यक्त केले.
या निमित्ताने मला
Saturday, December 21, 2013
ज्योतिषाचे हमीपत्र?
17 डिसेंबर च्या महाराष्ट्र टाईम्स मधे वाचकांच्या पत्रात प्रा. य. ना. वालावलकर यांचे खालील पत्र छापुन आले आहे.
ज्योतिषाचे हमीपत्र असे हवे
’ज्योतिषी आपल्या आश्रयदात्याकडून (क्लाएंट) - भविष्याच्या परिणामाची कोणतीही जबाबदारी भविष्य सांगणार्यायवर नाही- असे हमीपत्र लिहून घेणार ’ हे वृत्त (मटा ११ डिसेंबर) वाचले. पृच्छकाकडून हमीपत्र घेणे योग्य नाही. ज्योतिषी पैसे घेउन भविष्य सांगतात.उपाय सुचवतात. तेव्हा त्यांनी पुढीलप्रमाणे हमीपत्र द्यावे ’
ज्योतिषाचे हमीपत्र असे हवे
’ज्योतिषी आपल्या आश्रयदात्याकडून (क्लाएंट) - भविष्याच्या परिणामाची कोणतीही जबाबदारी भविष्य सांगणार्यायवर नाही- असे हमीपत्र लिहून घेणार ’ हे वृत्त (मटा ११ डिसेंबर) वाचले. पृच्छकाकडून हमीपत्र घेणे योग्य नाही. ज्योतिषी पैसे घेउन भविष्य सांगतात.उपाय सुचवतात. तेव्हा त्यांनी पुढीलप्रमाणे हमीपत्र द्यावे ’
Subscribe to:
Posts (Atom)

