Sunday, May 11, 2008

Press Conference - Astrological Test

पत्रकार परिषदेचा विषय
फलज्योतिषामधील शास्त्रीय तथ्य़ांशाबाबत परदेशात अनेकविध चाचण्या झाल्या आहेत.या संदर्भातील भारतातील पहिली वैज्ञानिक चाचणी तयार करण्यात आली आहे.याची माहिती डॊ जयंत नारळीकर देतील. या प्रक्रियेमध्ये आयुका, पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांचा सहभाग आहे. त्यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील.

स्थळ:- पत्रकार भवन; सोमवार दि. १२ मे २००८, सकाळी ११ वाजता.
प्रकाश घाटपांडे - समन्वयक
http://faljyotishachikitsa.blogspot.com
भ्रमणध्वनी- ९९२३१७०६२५

फलज्योतिष -चाचणी चे आवाहन
फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॊ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिति यांचा सहभाग रहाणार आहे.चाचणीचे स्वरुप सरळ व सोपे आहे.मतिमंद शाळेत शिक्षण घेणा-या १०० जन्मवेळा त्यांच्या पालकांच्या सहीने जमा करण्यात आल्या आहेत. शाळेत सातत्याने ७० टक्के व यापेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांच्या जन्मवेळा याच प्रमाणे जमा केल्या आहेत. मतिमंद असणे वा बुद्धिमान असणे हे व्यक्तिच्या बाबत अत्यंत वेगळी व स्पष्टपणे भिन्न अवस्था आहे. त्याचे प्रतिबिंब आयुष्यातील महत्वाच्या घटनांवर भाष्य करणा-या पत्रिकेत उमटावयास हवे. असे चाचणी संयोजकांचे मत आहे. नामवंत ज्योतिषी, फलज्योतिष संस्था वा हा व्यवसाय करणारी कोणीही व्यक्ती यांना चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जाहीरपणे करण्यात आले आहे. ज्यांच्या कडून अनुकूल प्रतिसाद लाभेल त्यांना सर्वसाधारणपणे चाळीस जन्मपत्रिका व जन्मवेळेचा तपशील या दोन्ही बाबी पाठवल्या जातील. या तपशीला मुळे आवश्यक वाटल्यास चाचणी देणारी संबंधीत व्यक्ती स्वत:देखील कुंडली बनवू शकेल.त्या कुंडलीद्वारे संबंधीत कुंडली ही मतिमंद मुलाची आहे कि बुद्धिमान मुलाची आहे एवढेच सांगावे अशी अपेक्षा आहे.चाचणी साठी दिलेल्या पत्रिकांतील काही पत्रिका या मतिमंद मुलांच्या तर काही पत्रिका या हुषार मुलांच्या असतील. ज्योतिषांनी कोणती पत्रिका कोणाची हे ९०% अचूक ओळखल्यास फलज्योतिष या विषयाकडे शास्त्र म्हणुन पहाण्यास मर्यादित अनुकुलता प्राप्त होईल.७०% पेक्षा कमी प्रमाणात उत्तरे बरोबर आली तर फलज्योतिष हे शास्त्र नाही हे आपोआपच सिद्ध होईल. ७०% ते ९०% प्रमाणात ज्योतिषाची भाकिते अचूक ठरल्यास आणखी मोठ्या सॆंपल सह चाचणी घेण्यात येईल. कुंडलीच्या आधारे आपले निष्कर्ष पाठवण्यास संबंधितांना पुर्ण एक महिना देण्यात येईल. ही चाचणी पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग हा 'डबल ब्लाईंड टेस्ट' या पद्धतीने घेईल. ज्योतिषांनी डॊ. सुधाकर कुंटे ,संख्याशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ पुणे ४११००७ या पत्त्यावरुन कुंडल्या मागवायच्या आहेत. ही चाचणी पुर्णत: विनामुल्य आहे. मात्र कुंडल्यांचे झेरॊक्स व पोस्टेज यासाठी सहभागी होउ इच्छिणा-यांनी ११'' * ९'' आकाराचे, रुपये ३५ ची तिकिटे लावलेला लिफाफा पाठवणे गरजेचे आहे. याच स्वरुपाच्या आणखी काही चाचण्या पुढील काळात घेण्याचा मनोदय आहे. त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक पाया आहे का? यावर अधिक प्रकाश पडू शकेल. ही चाचणी ही प्राथमिक आहे अंतिम नाही.

8 comments:

Unmesh said...

Dear Sir,
Thanks for taking up the leadership in considering or giving proper platform for scientific astrologers. Is it possible to collect data from a known place, say Statistics department to avoid the postal interference? or even by e-mail. This is because it is more likely that I may not be at home or in Pune or at given address to recieve the envelope and Postal people are not very co-operative in this regard. Now since you are already blogging you can easily handle giving the data by registration. Your blog has excellent verification processes any way. Do let me know on this
Best Regards
Unmesh

Prakash Ghatpande said...

Dear Unmesh
Thanx for showing interest.your suggession is been forwarded to our committee. I personally aggree with U
1) U can sent or deliver a letter with your details personally to dept of stat, pune university, pune 411007 reqesting to get data personally. but delivery of encrypted data will take approx 1 month.
2)It is possible to get data personally from dept of stat; prof sudhakar kunte mob 9923258679
3)One month is given to astrologer after receiving data to carried out analysis
4) astroger is requested sent it back along with his comment at backside of page

priya said...

hello sir.... i came to know abt "UPAKRAM ON ASTROLOGY" i really appretciate your efforts towards such a noble cause and would surely like to contribute towards such purpose by applying for test...wil it b fine to come down to pune for fillin up form as i stay in mumbai.....wat u recommend ....shal i come to pune or just send a letter ,....to come to pune from mubai wil nt b a problem.....just tell me to whom i shld meet in pune ...i wil b there in next week

thanx Sir..
regards
Anupriya

priya said...

hello sir

i m Anupriya from mumbai...i wil like to b a part of this test ,....so shal i come to pune to collect ...form n all ...as next week i m coming in pune ..so just let me know to who i shld meet in pune

thanx
Regards
Anupriya

Prakash Ghatpande said...

अनुप्रिया,
चाचणी मध्ये आपले स्वागत.
ही चाचणी पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग हा 'डबल ब्लाईंड टेस्ट' या पद्धतीने घेईल. ज्योतिषांनी डॊ. सुधाकर कुंटे ,संख्याशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ पुणे ४११००७ या पत्त्यावरुन कुंडल्या मागवायच्या आहेत. ही चाचणी पुर्णत: विनामुल्य आहे. मात्र कुंडल्यांचे झेरॊक्स व पोस्टेज यासाठी सहभागी होउ इच्छिणा-यांनी ११'' * ९'' आकाराचे, रुपये ३५ ची तिकिटे लावलेला लिफाफा स्वत:च्या पुर्ण पत्त्यासह पाठवणे गरजेचे आहे.
साधारण पणे १५ जुन पर्यंत ज्योतिषांचे प्रतिसाद आल्यावर त्यानंतर कुंड्ल्या पाठवल्या जातील.

Astrofaces said...

This is an invitation to visit the Astrofaces project at www.astrofaces.com which seeks to verify astrology with photographs grouped by sun, moon and ascendant.

Anand said...

Dear Shri. Ghatpande:

Can you provide some more information about the dataset you have created? Specifically, I wish to know
a) The size of the dataset
b) When and Where it was collected
c) By whom
If you could also provide technical information on why the dataset will be adequate to reach the conclusions you seek, it would be very helpful.

Sincerely,
Anand Soman

Prakash Ghatpande said...

एकूण शंभर मतिमंद मुले व शंभर हुशार मुले असा डेटा आहे. नारळीकरांनी केलेल्या आवाहनानुसार प्रथम मतिमंद मुलांच्या शाळेत अंनिसच्या काही स्वयंसेवकांनी जाउन तेथील प्रमुखांना विनंती केली. त्यानुसार त्यांनी पालकांना आवाहन करुन त्यांच्या सहीने जन्म स्थळ, जन्मतारीख ,जन्मवेळ ही माहीती असलेला एक फॉर्म म्हणजे आवश्यक असणारा विदा होय. हेच हुशार मुलांच्या बाबत लागू. साधारण पणे गेल्या तीन वर्षातील हा डेटा आहे. प्रतिसाद देणा-या ज्योतिषांना ४० रॆंडम सॆम्पल दिले जाणार आहेत. त्याचे सांकेतिकरण केले जाणार आहे.