फलज्योतिष चिकित्सा मंडळ हा एक ब्लॊग तर आहेच पण हे एक अनौपचारिक मंडळ आहे.यात फलज्योतिषाची चिकित्सा व्हावी असे ज्यांना मनापासुन वाटते ते सारे ज्ञात अज्ञात लोक या मंडळाचे सदस्य.
भूमिका व उद्दिष्टे :-
१) फलज्योतिष या विषयातील विविध मतप्रवाह जाणून घेण्याकरिता विविध प्रकारची पुस्तके, दुर्मिळ संदर्भग्रंथ, लेख, बातम्यांची कात्रणे संग्रही ठेवणे. त्यातील माहिती अद्ययावत ठेवणे
२) सर्वसामान्य तसेच जिज्ञासू लोकांना व संस्थांना या विषयावरील विनामूल्य माहिती देणे.
३) फलज्योतिषातील मर्यादा, त्यातील अंतर्विसंगती, त्रुटी या गोष्टी प्रयोग, आवाहन, लेख, चर्चा, परिसंवाद या माध्यमांद्वारा ज्योतिष वर्तुळात पोहोचवणे. त्यावर प्रतिवाद करण्यासाठी ज्योतिषी लोकांनाही विचार करण्यास प्रवृत्त करणे.
४) फलज्योतिषातील अनावश्यक तसेच अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करणेसाठी (उदा. ग्रहांची शांती, नारायण नागबली सारखे विधी, ग्रहांची अंगठी, मंत्रतंत्र इ. ) 'आपले घर आपणच साफ करा` ही मोहिम ज्योतिषांद्वारे राबविणे.
५) फलज्योतिष या विषयाचे संशोधनाद्वारे वेळोवेळी मूल्यमापन करणे.
६) फलज्योतिषाचे विराधक व समर्थक यांच्यात अभ्यास व चिकित्सेद्वारे समन्वय राखणे.