Sunday, March 26, 2017

गोरज मुहुर्त

माझे मित्र पराग दिवेकर गुरुजी हे गेली अनेक वर्षे पौराहित्य करतात. विवाह सारख्या विधींमधे येणार्‍या व्यावहारिक अडचणी त्यांना चांगल्या परिचित आहेत. त्यांनी पारंपारिक धार्मिक विधिंना आधुनिक लग्नविधीपद्धतीत सामावून घेतले आहे.ज्ञानप्रबोधीनी देखील आता याच प्रकारचा मॉडिफाइड लग्नविधी करत आहे. गोरज मुहुर्त हा सायंकाळी सुर्यास्ताच्या आसपास असतो. गायी संध्याकाळी परत गोठ्याकडे येण्याची वेळ म्हणजे गोरज. आता गायी शहरात नसल्या तरी ती वेळ आधुनिक जीवन शैली ला अत्यंत सुसंगत आहे. पण  हा मुहुर्त केवळ ब्राह्मणेतरांमधे विशेष वापरात आहे. खर तर तो सर्वांना सोयीचा आहे. शास्त्रात तो ब्राह्मणांनी वापरुच नये असे कुठे म्हटले नाही. पण केवळ लोकसमूहाची परंपरा म्ह्णून तो ब्राहमणात वापरत नाहीत. अलिकडे अनेक उच्चभ्रू ब्राह्मण समाजात तो वापरात येत आहे. विशेषत; लॉन्स मधे सायंकाळ ही लग्नाची खूप सोयीची वेळ असते. लग्न व रिसेप्शन एकत्र असे मोठे फंक्शन करण्याचा प्रघात पडू लागला आहे.  पंचांगातील रेडिमेड मुहुर्त हे रेडिमेड कपड्यांसारखे असतात तर काढीव मुहुर्त हे टेलरमेड कपड्यांसारखे असतात. माझ्या यंदा कर्तव्य आहे या पुस्तकात याची सविस्तर चर्चा आहेच.

3 comments:

Parag said...

खुप छान

Parag said...

खुप छान

deepuski bolarov said...

छान लेख,,,,,आवडला,,,