मंत्रतंत्र बाबा बुवा ज्योतिष च्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशीर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच. डॉ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच."
Showing posts with label ग्रंथपरिचय. Show all posts
Showing posts with label ग्रंथपरिचय. Show all posts
Tuesday, March 22, 2016
औषध उतारे आणि आशीर्वाद
मंत्रतंत्र बाबा बुवा ज्योतिष च्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशीर्वाद. मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors डॊ सुधीर कक्कर यांच. डॉ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस वाटल हे वाचताना त्यांची भुमिका समजली. ते म्हणतात," अनेक शहाणी-सुरती दिसणारी- म्हणजे असलेली म्हणायला हरकत नाही, अगदी सुशिक्षित, सुसंकृत उच्चभ्रु समाजातील मंडळी स्वामी, महाराज गुरु यांच्या कच्छपी कशी लागतात? मला अध्यात्मातले काही कळत नाही. परंतु यातले काही गुरु मला उघडपणे भोंदु दिसत होते. पण माझीच काही मित्रमंडळी मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पायावर डोके ठेवत होती. त्यातुन त्यांना काहीतरी मिळत होते हे निश्चितच."
Thursday, October 24, 2013
ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत
ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत हे पुस्तकच प्रकाशझोतात आल ते श्रीराम लागूंच्या भाषणामुळे. लोकवाङमय गृह व लोकविज्ञान चळवळ यांचे तर्फे आयोजित या पुस्तकाच्या प्रकाशनात डॉ लागू म्हणाले," ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते फसवणुकीचे, भविष्यविषयक लोकांच्या कुतुहलाचा फायदा घेउन स्वत:ची तुंबडी भरण्याचे. ज्योतिषासारख्या अंधश्रद्धा केवळ समाजाचे शोषण करतात म्हणुन निषेधार्ह नाहीत तर त्या व्यक्तिला,समाजाला बौद्धिक दृष्ट्या खच्ची करतात. त्याची सारासार विचारशक्ती मारतात.त्यामुळे वरकरणी कितीही निरुपद्रवी भासणारी अंधश्रद्धा ही समाजाला घातक ठरते."
पुस्तकाची प्रस्तावना ही 'पुरस्कार' म्हणुन ग.वा.बेहेरे यांनी लिहिली आहे,त्यात त्यांनी स्वत:चे अनुभव मांडलेत.राशीभविष्य लिहायला कोणतीही अक्कल लागत नाही. मी सुद्धा काही काळ ते लिहिले आहे असे ते म्हणतात.
पुस्तकाच्या स्वरुपात विशाल नावाचा एक मुलगा आपल्या काकांना जिज्ञासेने प्रश्न विचारतो व त्याचे वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे काका हे त्याच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर देतात. विशालच्या प्रश्नांना उत्तर देता देता आपल्या प्रश्नांचीही उत्तरे मिळून जातात.पुस्तकाच अस स्वरुप हे जाणीव प्रुर्वक असाव. कारण किशोरवयीन जिज्ञासा या वेळीच जाणुन त्यांना जर वैज्ञानिक दृष्टीकोनाची दिशा दाखवली तर होणारी युवापिढी ही विज्ञाननिष्ठ होईल.विशालच्या प्रश्नातून खगोलशास्त्राची सुरवात,पंचांगातील खगोलशास्त्र,खगोलशास्त्रात फलज्योतिषाची सरमिसळ, माणसाच्या दुबळेपणाचे फायदा घेणारे ज्योतिष,ग्रहण व अंधश्रद्धा असे विषय मांडले आहेत. याव्यतिरिक्त बुवांचे चमत्कार व त्यामागील विज्ञान व उपसंहारात अंधश्रद्धा व विज्ञान विषयक इतिहासाचा मागोवा घेतला आहे. परिशिष्ट मधे गाडगे बाबा ते प्रबोधकार ठाकरे यातील दैववादाचा फैलावा. म.फुले समग्र वाङमय मधील 'आकाशातील ग्रह', आगरकरांच्या सुधारक मधील 'आमचे ग्रहण अजून सुटले नाही', महादेवशास्त्री जोशी यांच्या 'आत्मपुराण' मधील संदर्भोचित वेचे घेतले आहेत.
लेखक- जगदीश काबरे
प्रकाशक- सुकुमार दामले, लोकवाङमय गृह,८५ सयानी रोड भुपेश गुप्ता भवन प्रभादेवी मुंबई २५
पृष्ठे-७३
मूल्य- पंधरा रुपये.

Monday, October 21, 2013
फलज्योतिष चिकित्सा
फलज्योतिष चिकित्सा : लेखक रा.ज.गोखले.
पुण्यातील रा.ज.गोखले या भुगोल शिक्षकाने हे पुस्तक १९३५ साली प्रकाशित केले आहे.पुस्तक अर्थातच त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमिवर आहे. लेखकाने फलज्योतिष या विषयावर संशोधन व्हावे व त्यासाठी फलज्योतिषाभिमानी जहागीरदार व संस्थानिक यांनी पुढाकार घ्यावा असे सुचित केले आहे. संशोधनापासून होणारा फायदा अधोरेखित करताना लेखक म्हणतो," या शास्त्रापासून निश्चित ज्ञान बहुतेके बाबीत मिळत नसेल व त्याचा तादृश उपयोग नसेल तर तसे जाहीर झाल्याने गरीब लोकांचा या शास्त्राचा सल्ला घेण्यात होणारा द्रव्याचा व कालाचा अपव्यय वाचेल व जनतेची दिशाभूल होणे टळेल.भविष्य ज्ञेय पण अटळ असेल,तर त्याचा खासगी व्यवहारात काही उपयोग नाही; पण ऐतिहासिक माहिती मिळवण्याच्या कामी उपयोग झाल्यास ऐतिहासिक ज्ञानवृद्धी च्या कामी या शास्त्राचा उपयोग करुन घेता येईल." फलज्योतिषाच्या मूलतत्वास निश्चित आधार मिळतो काय? शास्त्रात मानल्या गेलेल्या कारणांचा अपुरेपणा, भिन्न व परस्परविरोधी असलेले ज्योतिषातील पंथ, ग्रहयोग सूचक आहेत की कारक याबद्दलचा विचार,होय किंवा नाही हे उत्तर ग्रहहोगावरुन निश्चितपणे मिळणे शक्य आहे काय? शास्त्रातील मतभेद व संदिग्धता यामुळे वारंवार होणार्या घोटाळ्यांची उदाहरणे अशा अनेक पातळ्यांवर छोटी मोठी प्रकरणे पुस्तकात घेतली आहेत.बर्याच वेळा लोकमान्य टिळकांच्या कुंडली वर केलेली भाष्य उदाहरणात घेतली आहेत.फलज्योतिषाची आजची स्थिती ( म्हणजे १९३५ सालातील) मांडताना पुरस्कर्ते व विरोधी यांचे भिन्न पक्ष लेखकाने मांडले आहेत.

Thursday, October 10, 2013
फलज्योतिष एक महाथोतांड
फलज्योतिष एक महाथोतांड
पुस्तकाच्या नावावरुनच फलज्योतिषावर अतिशय टीका करणारे पुस्तक आहे हे सांगायलाच नको.लेखक सुधाकर भालेराव हे खगोलशास्त्राचा अभ्यासक असून त्यावर त्यांनी विपुल लेखन व व्याखाने दिलेली आहेत. लेखकाच्या आपली सूर्यमाला तसेच कृत्रिम उपग्रह आणि अवकाश विज्ञान या ग्रंथांना राज्य पुरस्कार ही मिळाले आहेत.
पुस्तकाच्या सुरवातीला खगोलशास्त्र व फलज्योतिष यातील फरक सांगितला आहे. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर होणार परिणाम, जन्मकुंडली हा जन्मक्षणीचा नकाशा मांडता्ना असलेली पृथ्वी हा भगोलाचा मध्य ही संकल्पना या गोष्टी खगोलशास्त्रीय दृष्ट्या कशा चुकीच्या आहेत हे मांडले आहे. अवकहडा चक्र ही ग्रीकांची अब्रॆका बाब्रा ची उसनवारी असून त्यात चातुर्वण घुसवण्याचे उद्योग कुणाचे? असा प्रश्न लेखक विचारतो.भारतीय पंचांग कशी चुकीची आहेत व त्यामुळे पडणार्या सायन निरयन कुंडली विषयी विवेचन त्यात आहे. फलित अथवा भविष्यकथन या प्रकारातील अपरिहार्य भाग म्हणजे राशीस्वभाव,ग्रहांच्या उच्च नीच राशी,कुंडलीतील भाव व स्थाने,ग्रहांच्या जाती,मंगळाचे खूळ,शनीची साडेसाती या विषयी थोडक्यात विवेचन मांडले आहे. त्यानंतर कोसळलेली भाकिते-दुटप्पी भाषा, राष्ट्राची कुंडली, फलज्योतिषाचा वैज्ञानिकांनी केलेला अभ्यास या मुद्यांनी पुस्तकाचा शेवट केला आहे.
एकंदरीत पुस्तकात फलज्योतिष हे केवळ थोतांड नसून महाथोतांड आहे हे आव्हानात्मक भाषा वापरुन सांगितले आहे. वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज व डॊ सुरेंद्र बारलिंगे याचा अभिप्राय पुस्तकाच्या स्रुरवातीला आहे.
लेखक-सुधाकर भालेराव.
प्रकाशक
महाराष्ट्र रॆशनॆलिस्ट असोसिएशन
२४७ रमा नारायण निवास, तेलंग रोड माटुंगा मुंबई १९
प्रथम प्रकाशन- ४ मे १९८४
मूल्य- तीन रुपये
पृष्ठे -२२

Wednesday, April 10, 2013
यंदा कर्तव्य आहे?
मनोगत
काय! तुम्ही पण अंधश्रद्धाळूच की राव ! लग्नाला एक तप पूर्ण झाल्याचे निमित्त म्हणा औचित्य म्हणा साधून हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय मी व्यक्त केल्यावर आमच्या एका स्नेहयांनी ही प्रतिक्रिया दिली. मला मोठी गंमत वाटली. मुहूर्त या प्रकाराविषयी मानसिकता अशी पण रुजत गेली त्याचा हा आगळा वेगळा पैलू. अनेक विवाह संस्था लग्न जुळवताना सर्व प्रकारची मदत करतात. माहिती पुरवतात. पण पत्रिकेला किती महत्व द्यावे असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे अशी भूमिका घ्यावी लागते. मग विवाहाचे वेळी पत्रिका जुळते का? हे बघणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. प्रश्नकर्त्याला समोरच्याची काय भूमिका आहे हे समजावून घेण्याचा तो एक मार्ग असतो. विचारणारा माणूस संभ्रमात पडलेला असू शकतो. तो विवाहाच्या वेळी पत्रिका बघून निर्णय देणार असेल तर त्याला हा प्रश्न पडू शकतो. कदाचित आपल्या या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून हिणवले गेले असण्याची खंत असू शकते. आपल्या या श्रद्धेला कुणाचा तरी पाठिंबा असण्याची शक्यता अजमावी हा हेतू असू शकतो. काही तरी गुळमुळीत सांगू नका राव ! एकतर श्रद्धा तरी म्हणा किंवा अंधश्रद्धा तरी म्हणा! असे म्हणून समोरच्याला कैचीत पकडण्याचा हेतू असू शकतो. त्या निमित्त काही तरी वादसंवाद घडावा अशीही इच्छा असू शकते.
आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही. म्हणूनच विवाह ठरवताना पत्रिका बघावी की नाही? हे कोणी अमुक प्रसिद्ध व्यक्ति सांगते म्हणून न ठरवता संबंधितांनी स्वत: पत्रिका बघण्याची, जुळविण्याची पद्धत समजून घेउन मगच ठरवावे एवढीच या पुस्तकाच्या निमित्ताने नम्र विनंती.
पुस्तक खालील दुव्यावरुन डाउनलोड करु शकता.
यंदा कर्तव्य आहे
लेख माला स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा. सदर लेखमाला मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर आहे
प्रकाश घाटपांडे
Tuesday, February 16, 2010
फलज्योतिष शास्त्र कि अंधश्रद्धा?
पाश्चात्य जगतात गेल्या ३०-४० वर्षांत फलज्योतिषावर जे प्रचंड संशोधन झाले, त्याची फारच थोडी कल्पना मराठी वाचकांना असेल. ती कल्पना त्यांना यावी आणि या वादग्रस्त विषयाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन कसा आहे हेही त्यांना समजावे, या उद्देशाने हा अनुवाद यशोदा भागवत यांनी करून मराठी भाषेच्या शास्त्रीय विभागात फार मोलाची भर घातली आहे. अशा प्रकारची शास्त्रविषयक पुस्तके मराठीत फारच थोडी आहेत.
मूळ ग्रंथाचे लेखक दोघेही मानसशास्त्राचे पदवीधर आहेत. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा त्यांना कशी झाली ते त्यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे. फलज्योतिष या विषयावर दोन अगदी परस्परविरोधी तट विसाव्या शतकाच्या आरंभापासून पडलेले आहेत. विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी लोक फलज्योतिष हे शास्त्र नव्हे तर केवळ एक थोतांड आहे, असे मानतात. त्याउलट या शास्त्राचे समर्थक असे म्हणतात की हजारो वर्षांच्या अनुभवांच्या आधारावर हे शास्त्र उभे आहे आणि ते बहुसंख्य लोकांच्या विश्वासास पात्र झालेले आहे. म्हणून ते एक खरे शास्त्र आहे.

Sunday, October 11, 2009
फलज्योतिष विद्येवर शोध किरण
फलज्योतिष - विद्येवर शोध किरण
फलज्योतिष विद्येवर शोध किरण या पुस्तिकेच्या नावावरुन जर कुणाचा असा समज झाला असेल कि हे पुस्तक आपल्याला फलज्योतिष शिकण्यास उपयुक्त आहे तर तो गैरसमज आहे. या पुस्तिकेचा उद्देश हा मनोरंजन किंवा फलज्योतिष शिकवणे असा नसून सामान्य लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. मनुष्याची बुद्धी मूलत: चिकित्सक असली तरी फलज्योतिषाच्या गूढ वलया भोवती लोप पावते.एवढे लोक विश्वास ठेवतात म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे म्हणुन आपणही विश्वास ठेवलेला बरा अशी जी मनोवृत्ती आहे त्याची लेखकाला खंत वाटते.नाडी या प्रकरणाचे शास्त्रीय स्पष्टीकरण जे लोक देउ शकत नाहीत ते लोक एकनाड आहे तर संतती होणार नाही असे बिनधास्त ठोकून देतात.त्यामुळे चांगली अनुरुप असलेली स्थळे हातची
घालवावी लागतात या गोष्टी ची चीड येउन लेखकाने त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून ही पुस्तिका लिहिली आहे.
घालवावी लागतात या गोष्टी ची चीड येउन लेखकाने त्याला पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून ही पुस्तिका लिहिली आहे.
Friday, September 18, 2009
ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड
फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्यांचे भारुड हे नावच इतके स्वयंस्पष्ट आहे कि लेखकाला नेमक काय म्हणायच आहे हे यातुन स्पष्ट होत. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर फलज्योतिष = लोकभ्रम + लबाडी+योगायोग+ इंट्युशन ग्रहतारे हे फक्त शोभेसाठी!
असे समीकरण मांडुन लेखकास काय सांगायच आहे याचे मुद्दे दिले आहेत. काही मुद्दे थोडक्यात असे आहेत.
Thursday, March 27, 2008
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातून सुसंवाद
ई आवृत्तीच्या निमित्ताने
जेव्हा २००१ मध्ये प्रथम व २००३ मध्ये द्वितीय मुद्रित आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा खरं तर मला हे सगळं संकेतस्थळावरच लिहायच होत. म्हणुनच त्याचे स्वरुप एफ ए क्यु असे ठरवले गेले. पण एक विचार मनात आला कि इंटरनेटचा वापर करणारा वर्ग किती? त्यातून अशा प्रकारचे संकेतस्थळ पहायला कोण येणार? आपल्याला जर आपल्या वाचक वर्गापर्यंत पोचायचे असेल तर मुद्रित माध्यम व मराठी भाषा हाच पर्याय आहे. तो इंटरनेटचा वापर करणारा वर्ग नाही. तरी देखिल पुण्या-मुंबई कडचा वर्गच हे वाचणार खेड्यातील वर्ग पुन्हा वंचित राहणार. पण मला माझ्या मर्यादाही लक्षात घेणे आवश्यक होते. त्यानंतर प्रो. जयंत नारळीकरांनी लोकसत्ता १३ एप्रिल २००३ मध्ये परिक्षण लिहिल्याने पुस्तक एकदम प्रकाशात आले. पुढे हे मनोविकास प्रकाशनने प्रकाशित करण्यास रस दाखवला. त्यामुळे ते व्यावसायिक पद्ध्तीने जुलै २००५ वितरित झाले.महाराष्ट्र पोलिस बिनतारी विभागातून अपघातानेच मी स्वेच्छानिवृत्त झालो व नंतर उपक्रमावर अपघातानेच आलो. वाटल आपलं पुस्तक जर महाराष्ट्राबाहेरील व परदेशी मराठी बांधवांना वाचायच असेल तर तो वर्ग हे पुस्तक मुद्रित स्वरुपात उपलब्ध करुन वाचू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ई आवृत्तीच काढली पाहिजे. मग लेखमाला स्वरुपात हे टाकत राहिलो. उपक्रमामुळे हे ई - आवृत्ती स्वरुपात येण्यात मला अतिशय आनंद होतो आहे. उपक्रम व उपक्रमींचे मी प्रोत्साहनाबद्दल आभार मानतो.
पुस्तक डाउनलोड करण्यासाठी शिर्षकावर टिचकी मारा
प्रकाश घाटपांडे
डी २०२ कपिल अभिजात डहाणुकर कॉलनी. कोथरुड पुणे
दि. २८ फेबुवारी २००८
Tuesday, June 26, 2007
भारतीय ज्योतिषशास्त्र
ग्रंथप्रदर्शनातून बाहेर पडता पडता दुर्लक्षित ठिकाणी उपेक्षितासारखे पडलेले एक पुस्तक सहज दृष्टोत्पत्तीस पडल आणि मी ते डोळे झाकून खरेदी केलं. ते पुस्तक म्हणजे."भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास" ले. शं.बा.दिक्षित'. डॊ.थीबोसारख्या पाश्चात्य विद्वानाला हे पुस्तक मूळातून वाचण्यासाठी मराठी भाषा शिकावी लागली
शामभट्ट व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत
शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत
उपेक्षितांच्या दुनियेत काही गुणवंत माणसे जशी असतात तशी काही पुस्तकंही असतात. काळाच्या पडद्या आड माणसे असो वा साहित्य असो इतिहासात त्याची दखल घेतली तरी काळाच्या प्रवाहात ती गडप होउन जातात. एखादा सामान्य वकूबाचा माणूस देखील प्रसिद्धीचे तंत्र उमगल्यामुळे व्यवहारात यशस्वी होतो तर एखादा असामान्य माणूस देखिल प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहिल्याने दुर्लक्षित रहातो. पुस्तकांचही तसच आहे. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फलज्योतिष हा विषय मध्यवर्ती घेउन कुणी एखादी विनोदी कादंबरी लिहिली असेल असे कुणाला वाटत नाही.प्रो. नारळीकरांशी एकदा सहज गप्पा मारताना म्हणून या पुस्तकाचा परिचय करुन दिला. त्यांनी ते पुस्तक विमानप्रवासात वाचले. त्यांना ते पुस्तक खूप आवडले. ते पुस्तक म्हणजे शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत भाग १ ते ३, लेखक: चिंतामण मोरेश्वर आपटे
Wednesday, May 09, 2007
ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद
भाग १
कुंडली पंचांग राशी नक्षत्रे
१) फलज्योतिष म्हणजे काय़?२) पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?३) जन्मकुंडली म्हणजे काय?४) जन्मरास म्हणजे काय?जन्मनक्षत्र म्हणजे काय?५)नावावरुन रास कशी काढतात?६) प्रश्नकुंडली म्हणजे काय? ती मांडून उत्तरे कशी देतात?७) अमावास्या अशुभ दिवस आहे काय?८) अमावस्या, पौर्णिमेला शस्त्रक्रिया केल्यास रक्तप्रवाह जास्त होतो हे कितपत सत्य आहे?९) अमावस्या पोर्णिमेला वेडाचे झटके,अपघातचे प्रमाण जास्त का असते?१०) हिंदू धर्मात पावसाळ्यात जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो. असा अनुभव येतो.मग नक्षत्रे व मोसमी पाउस यांचा संबंध आहे का?११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातील सगळी गणिते बदलली का?१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का?
काही सामान्य शंका
१४) साडेसाती काय प्रकार आहे?१५) कालसर्प योग म्हणजे काय?१६) नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात?१७) ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?१८)ग्रहदशा अंतर्दशा हा काय प्रकार आहे?१९) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?२०) काही ज्योतिषी आयुष्यातील घटना अचूक सांगतात ते कसे?२१) हिरोशिमा व नागासाकि शहरात अणुबॉंब पडला त्यावेळी लाखो लोक मेले, विमान अपघात. रेल्वे दुर्घटना वा भुकंप या सारख्या घटनांमध्ये शेकडो लोक मरतात मग त्या सर्वांच्या कुंडल्यात काय एकाच वेळी मृत्युयोग होता असे म्हणायचे का?२२) ज्योतिषांवर दुटप्पीपणाचा आरोप केला जातो. ज्योतिषी लोक खरोखरच दुटप्पी आहेत का?२३) ग्रहांना दैवी शक्तीची प्रतिके मानून त्यांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत, डोळ्यांनान दिसणा-या परमेश्वराचे प्रतिक हवे म्हणून माणूस मुर्तीची स्थापना करतो व तिची आराधना करतो.तसेच ग्रहांच्या बाबतीत केले तर काय बिघडले?२४) ग्रहाची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?२५) ग्रहांचे खडे वापरल्याने अनिष्ट प्रभाव कमी करता येतात का?२६) प्रयत्नाने भविष्य बदलता येते का?
विवाह, पत्रिका आणि ज्योतिष
२७)पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?२८)विवाह जुळण्याचे वेळी पत्रिका बघावी का?२९)मंगळदोष म्हणजे काय?३०) एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?३१) मृत्यूषडाष्ट्क काय आहे?३२) मुहूर्त पाहणे योग्य कि अयोग्य?३३) गुरुबळ कशासाठी पहातात?३४) मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांती करावयास का सांगतात?३५) मूळ नक्षत्र सास-यास वाइट,आश्लेशा नक्षत्र सासूस वाइट असे म्हणतात ते कितपत बरोबर आहे?३६) सिंहस्थात विवाह करु नये असे का म्हणतात?३७) गुरु संततीकारक ग्रह का मानतात?
फलज्योतिषाच्या विविध पद्ध्ती
३८) मेदनिय ज्योतिष हा काय प्रकर आहे?३९) राजकिय भाकिते कशी वर्तवली जातात?४०) भुकंपाचे भाकित वर्तवता येणे शक्य आहे काय?४१)भृगूसंहिता हा काय प्रकार आहे?भृगूसंहितेमध्ये जगातल्या सर्वांच्या कुंडल्या सापडतात कशा?४२) नाडी म्हणजे काय? नाडी भविष्य हा फलज्योतिषाचा प्रकार आहे का?४३) दक्षिण भारतात केवळ तुमच्या अंगठ्याच्या ठशावरुन तुमचे नाव,तुमच्या बायकोचे नाव,तुमची कुंडली तुमचा वर्तमान काळ,भूत, भविष्य सर्व काही प्राचीन ऋषींनी लिहिलेल्या ताडपट्ट्यावर सापडती ते कसे? याविषयी विंग कमांडर शशीकांत ओक यांनी 'नाडी भविष्य एक चक्रावून टाकणारा चमत्कार' व 'बोध अंधश्रदधेचा' या पुस्तकात स्वतः अनुभव घेउन लिहिले आहे. ते काय खोटे?४४) नॉस्त्रॅडॅमस ने जगाच्या महत्वाच्या घडामोडींचे भाकिते पुर्वीच वर्तवून ठेवली आहेत. त्यात भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून जगभरात बलशाली राष्ट्र होइल असे म्हटले आहे.ते खरे आहे काय?४५) लोकमान्य टिळक यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास असून त्यांचा त्यावर विश्वास होता असे म्हणतात ते खरे का?४६) वास्तू ज्योतिष काय प्रकार आहे?
फल ज्योतिष शास्त्र? प्रवाद, समजुती
४७) फलज्योतिष हे शास्त्र आहे काय?४८) हे गोकॅलिन चे संशोधन नेमके काय आहे?४९) चंद्र सूर्याचा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून भरती ओहोटी हा दृष्य परिणाम होतोच ना! मग त्याचप्रमाणे ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण, चुंबकिय आकर्षण अशा शक्तींचा परिणाम आपल्यावर कशावरुन होत नसेल?५०) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित आहे का?५१) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित नाही तर वैद्न्यानिकांनी त्याविरोधी ठोस भुमिका का घेतली नाही?५२) जर ज्योतिष हे शास्त्र नाही तर वर्तमानपत्रे नियतकालिके राशी भविष्य का छापतात?५३) आमचा फलज्योतिषाचा अभ्यास नाही,तरी पण हे शास्त्र भ्रामक आहे हे आम्हास कसे कळावे?५४) राजकारणी, सिनेनट व्यावसयिक हे ज्योतिषाचा सल्ला घेतातच की?५५) लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरोपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का?५६) फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाइट काय?५७) मग ज्योतिषाकडे जाणा-या माणसाला तुम्ही काय पर्याय द्याल?५८) दोन तज्न्य डॉक्टरांची तरी कुठे एकसारखी मते असतात मग दोन ज्योतिषांची भाकिते सारखीच असली पाहिजेत असा आग्रह का५९) विद्न्यान तरी कुठे परिपूर्ण आहे? मग ज्योतिषशास्त्र तरी कसे परिपूर्ण असेल?६०) फल ज्योतिष विद्न्यान नसेना का पण उपयुक्त तर आहे?६१) अहो ज्योतिष विषय विद्यापीठात सुद्धा शिकवला जातो ते काय उगीच का?६२) परदेशातील फलज्योतिषसंशोधनाची उदाहरणे नेहमीच उगाळली जातात मग आपल्या कडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?६३) आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना काय आव्हाने दिली? ती कोणी स्वीकारली अगर कसे?
भाग दोन
स्फुट लेखन
फल ज्योतिषः एक प्राथमिक चिकित्सक दृष्टिकोण
नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष
फेंग शुई! वास्तुशास्त्राला चिनी चॅलेंज
यूजीसी आणि फलज्योतिष
फलज्योतिषचिकित्सेविषयी एरिक रेग यांनी संकलीत केलेले पाश्चिमात्य विचार
आखिल भारतीय ज्योतिषसंमेलन, सोलापूर २००१ च्या निमित्ताने
पुस्तक लेखमाला स्वरुपात वाचण्यासाठी शीर्षकावर टिचकी मारा.
Monday, September 18, 2006
पुस्तक परिक्षण -प्रो.जयन्त नारळीकर

लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परिक्षण
-----------------------------------------------------------------
अंधश्रद्धांकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टि
भारत हा अनेक दृष्टीने वैधर्म्यांचा देश समजला जातो. बैलगाडी पासून जेट विमाने, मातीच्या झोपड्यांपासून गगनचुंबी आलिशान इमारती, वीज आणि पाणी दुर्मिळ असलेल्या खेड्यांपासून रात्रिचा दिवस करु शकणा-या रोषणाईत,खाद्यपेयात पैसा पाण्यासारखा खर्च करणा-या महानगरांपर्यंत मानवी जीवनाची दोन टोके आपण पहातो, पचवतो आणि दृष्टीआड करतो. पण या सर्व वैधर्म्यांइतकेच एक वेगळे वैधर्म्य देशात वाढत आहे.याची आपल्यापैकी बहुतेकांना जाणिवदेखील नसावी.
हे वैधर्म्य म्हणजे वैद्न्यानिक दृष्टीकोन आणि अंधश्रद्धा यांच्यातले! स्वातंत्र्यपूर्व काळात 'डिस्कव्हरी ऒफ इंडिया' पुस्तक लिहिताना जवाहरलाल नेहरुंनी अशी आशा व्यक्त केली होती, की स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनता केवळा परंपरांचे अंधानुकरण न करता त्यातील युक्तिसंगत सार तेवढे घेईल आणि जीवनातले निर्णय घेताना वस्तुस्थितीची सप्रमाण दखल घेईल. परंतु आज स्वातंत्र्य मिळुन पाच दशके उलटली तरी अंधश्रद्धांचा पगडा होता तसाच आहे- नव्हे वाढतो आहे.असे विदारक दृश्य आज दिसते आहे.
Subscribe to:
Posts (Atom)