Thursday, March 27, 2008

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातून सुसंवाद


ई आवृत्तीच्या निमित्ताने
जेव्हा २००१ मध्ये प्रथम व २००३ मध्ये द्वितीय मुद्रित आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा खरं तर मला हे सगळं संकेतस्थळावरच लिहायच होत. म्हणुनच त्याचे स्वरुप एफ ए क्यु असे ठरवले गेले. पण एक विचार मनात आला कि इंटरनेटचा वापर करणारा वर्ग किती? त्यातून अशा प्रकारचे संकेतस्थळ पहायला कोण येणार? आपल्याला जर आपल्या वाचक वर्गापर्यंत पोचायचे असेल तर मुद्रित माध्यम व मराठी भाषा हाच पर्याय आहे. तो इंटरनेटचा वापर करणारा वर्ग नाही. तरी देखिल पुण्या-मुंबई कडचा वर्गच हे वाचणार खेड्यातील वर्ग पुन्हा वंचित राहणार. पण मला माझ्या मर्यादाही लक्षात घेणे आवश्यक होते. त्यानंतर प्रो. जयंत नारळीकरांनी लोकसत्ता १३ एप्रिल २००३ मध्ये परिक्षण लिहिल्याने पुस्तक एकदम प्रकाशात आले. पुढे हे मनोविकास प्रकाशनने प्रकाशित करण्यास रस दाखवला. त्यामुळे ते व्यावसायिक पद्ध्तीने जुलै २००५ वितरित झाले.महाराष्ट्र पोलिस बिनतारी विभागातून अपघातानेच मी स्वेच्छानिवृत्त झालो व नंतर उपक्रमावर अपघातानेच आलो. वाटल आपलं पुस्तक जर महाराष्ट्राबाहेरील व परदेशी मराठी बांधवांना वाचायच असेल तर तो वर्ग हे पुस्तक मुद्रित स्वरुपात उपलब्ध करुन वाचू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ई आवृत्तीच काढली पाहिजे. मग लेखमाला स्वरुपात हे टाकत राहिलो. उपक्रमामुळे हे ई - आवृत्ती स्वरुपात येण्यात मला अतिशय आनंद होतो आहे. उपक्रम व उपक्रमींचे मी प्रोत्साहनाबद्दल आभार मानतो.
पुस्तक डाउनलोड करण्यासाठी शिर्षकावर टिचकी मारा

प्रकाश घाटपांडे
डी २०२ कपिल अभिजात डहाणुकर कॉलनी. कोथरुड पुणे
दि. २८ फेबुवारी २००८