वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान गेलो होतो. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय असा वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . त्यांना ज्योतिषाबद्दल आस्था होती. मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)
वि.म कधी वारले ते मला आठवत नाहि पण १९९९ पुर्वी. त्या आगोदर काही काळ भारत इतिहास संशोधक मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमात त्यांनी मतिमंदाच्या शंभर कुंडल्यांसाठी जर शंभर नियम असतील तर त्यात काही अर्थ नाही. असे सांगितले होते. तेव्हाही मी कार्यक्रमाला हजर होतो. हा पहा वि म दांडेकरांचा सा.सकाळ मधील ८ जुलै १९८९ चा लेख