Thursday, September 18, 2008

कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

सप्टेंबर २००८ चा अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र चा ज्योतिष विशेषांक पाहिला अन माधव रिसबुडांची आठवण तीव्रतेने झाली. माधव रिसबुड २००३ साली निवर्तले.खालील लेख खरं तर मी अंनिस वार्तापत्राच्या एका दिवाळी अंकासाठी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबुडांनी ज्योतिष चिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठीकाणी वकीली केली होती. अंनिस चे हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख वार्तापत्राच्या संपादक मंडळाने नाकारला. कारण म्हणे त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होते. मनोगतच्या संपादकांना तसे विरोपाद्वारे मी कळविले होते. अंनिस वार्तापत्राने हा नाकारलेला लेख मनोगत च्या दिवाळी २००७ च्या अंकात जालावर प्रसिद्ध झाला आणि ख-या अर्थाने रिसबुडांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे वाटले. इथेही तो पहाता येईल.

कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'.

Saturday, September 06, 2008

नशीब

नवमस्थान हे प्रारब्ध संचित भाग्य यांचे स्थान आहे. तुम्हाला नशीबाची किती साथ आहे हे पहाण्यासाठी नवमस्थानातील ग्रह,नवमस्थानातील राशी, नवमेश हे पाहणे ज्योतिषात क्रमप्राप्त असते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे या नशीबाविषयी काय म्हणतात ते पहा.