Thursday, October 10, 2013

फलज्योतिष एक महाथोतांड

फलज्योतिष एक महाथोतांड
पुस्तकाच्या नावावरुनच  फलज्योतिषावर अतिशय टीका करणारे पुस्तक आहे हे सांगायलाच नको.लेखक सुधाकर भालेराव हे खगोलशास्त्राचा अभ्यासक असून त्यावर त्यांनी विपुल लेखन व व्याखाने दिलेली आहेत. लेखकाच्या आपली सूर्यमाला तसेच कृत्रिम उपग्रह आणि अवकाश विज्ञान या ग्रंथांना राज्य पुरस्कार ही मिळाले आहेत.
पुस्तकाच्या सुरवातीला खगोलशास्त्र व फलज्योतिष यातील फरक सांगितला आहे. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर होणार परिणाम, जन्मकुंडली हा जन्मक्षणीचा नकाशा मांडता्ना असलेली पृथ्वी हा भगोलाचा मध्य ही संकल्पना या गोष्टी खगोलशास्त्रीय दृष्ट्या कशा चुकीच्या आहेत हे मांडले आहे. अवकहडा चक्र ही ग्रीकांची अब्रॆका बाब्रा ची उसनवारी असून त्यात चातुर्वण घुसवण्याचे उद्योग कुणाचे? असा प्रश्न लेखक विचारतो.भारतीय पंचांग कशी चुकीची आहेत व त्यामुळे पडणार्‍या सायन निरयन कुंडली विषयी विवेचन त्यात आहे. फलित अथवा भविष्यकथन या प्रकारातील अपरिहार्य भाग म्हणजे राशीस्वभाव,ग्रहांच्या उच्च नीच राशी,कुंडलीतील भाव व स्थाने,ग्रहांच्या जाती,मंगळाचे खूळ,शनीची साडेसाती या विषयी थोडक्यात विवेचन मांडले आहे. त्यानंतर कोसळलेली भाकिते-दुटप्पी भाषा, राष्ट्राची कुंडली, फलज्योतिषाचा वैज्ञानिकांनी केलेला अभ्यास या मुद्यांनी पुस्तकाचा शेवट केला आहे.
एकंदरीत पुस्तकात फलज्योतिष हे केवळ थोतांड नसून महाथोतांड आहे हे आव्हानात्मक भाषा वापरुन सांगितले आहे. वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज व डॊ सुरेंद्र बारलिंगे याचा अभिप्राय पुस्तकाच्या स्रुरवातीला आहे.

लेखक-सुधाकर भालेराव.
प्रकाशक
महाराष्ट्र रॆशनॆलिस्ट असोसिएशन
२४७ रमा नारायण निवास, तेलंग रोड माटुंगा मुंबई १९
प्रथम प्रकाशन- ४ मे १९८४
मूल्य- तीन रुपये
पृष्ठे -२२

11 comments:

Author said...

हे पुस्तक आता बाजारात उपलब्ध आहे का? खरेदी करायचे असल्यास कुठून करता येईल?

Prakash Ghatpande said...

वाघेश ते पुस्तक बाजारात मिळणे जवळपास अशक्य. पण आपल्याला ते वाचता येईल. ब्लॊगवरील ग्रंथालयात जा. तिथे आपल्याला ते दिसेल. त्यातूनही काही अडचण आली तर मला मेल करा मी आपल्याला ते पीडीएफ स्वरुपात पाठविन.

patkar said...

साहेब ,
आपला परिचय नाही, परंतु एक विनंती , "फलज्योतिष एक महाथोतांड' 'पीडीएफ स्वरुपात मला पाठवू शकाल काय ?
सप्रेम आभार

दर्शनीय said...

खगोलशास्त्रात इतक्या संशोधन पातळीवर कार्य करणार्या श्री. सुधाकर भालेराव सरांबाबत " होतो तिथेच आहे जेथुनिया निघालो " असे म्हणता येईल.

दर्शनीय said...

खगोलशास्त्रात इतक्या संशोधन पातळीवर कार्य करणार्या श्री. सुधाकर भालेराव सरांबाबत " होतो तिथेच आहे जेथुनिया निघालो " असे म्हणता येईल.

Unknown said...

Can you please mail me this book. My email id is suprit_saoji@yahoo.co.in

Amol Debadwar said...

कृपया या पुस्तकाची pdf मला पाठवाल
debadwad.amol@hotmail.com

Sumedhg said...

कृपया मला पी डी एफ सेंड करा...

Unknown said...

आम्हाला पण पाठवा bhushankatre@gmail.com

Baliram Gholap said...

मला pdf द्या प्लीज.
baliramgholap1@gmail.com

Baliram Gholap said...

Mla pdf dya...
baliramgholap1@gmail.com