Thursday, January 09, 2014

ज्योतिष ही अंधश्रद्धा - डॉ वेंकटरामन


'भारत विकासाच्या वाटेवर जात असताना नशिबावर विश्‍वास ठेवत जातो. सरकार, राजकारणी याच विचारसरणीला पाठबळ देत आहेत, हे दुदैवच म्हणावे लागेल. ज्योतिषशास्त्राचा आधार घेत भविष्य वर्तविण्यात येते. ज्योतिषशास्त्र ही केवळ अंधश्रद्धा आहे. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याने ते शास्त्रही नाही,'' असे मत "नोबेल'विजेते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. वेंकटरामन रामकृष्णन यांनी पुणे येथ व्यक्त केले.

या निमित्ताने मला
'दी हयूमॅनिस्ट` या अमेरिकन मासिकाच्या सप्टेंबर १९७५ च्या अंकात 'ऑब्जेक्शन्स टू दी अस्ट्रॉलॉजी` अशा शीर्षकाचे एक निवेदन प्रसिद्ध झाले होते त्याची आठवण झाली.. त्या निवेदनावर युरोप अमेरिकेतल्या नामवंत १८६ शास्त्रज्ञांच्या सहया होत्या. ( सुरुवातीला ते १९२ होते नंतर त्यातील ६ गळाले ) यात काही नोबेल पारितोषिक विजेते सुध्दा होते. हे निवेदन डॉ. बार्ट जे बोक यांनी तयार केले होते. त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ग्रहतारे हे पृथ्वीपासून प्रचंड अंतरावर असल्याने त्यांचे गुरुत्वाकर्षणादि परिणाम ते पृथ्वीवर पोहोचे पर्यंत अगदी क्षीण होतात. अशा क्षीण प्रभावाने माणसाचे नशीब घडवले जाते असे मानणे बरोबर नाही. या निवेदनावर विख्यात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी सही देण्यास नकार दिला.
निवेदनात फलज्योतिषातील तत्वे व संकल्पना ही निरर्थक कशी आहेत? केवळ भौतिक परिणामाचा भाग न घेता त्यांचा योग्य तो समाचार त्यात घेवून त्यावर का विश्वास ठेवू नये अशी मांडणी त्यात नव्हती. केवळ वैज्ञानिक सांगतात म्हणून ते खरे असा काहीसा सूर त्या निवेदनात होता. केवळ याच कारणासाठी कार्ल सेगनचा नकार होता. हे त्याने स्पष्टही केले होते. पण समर्थकांनी आपल्याला हवा तसा अर्थ त्यातून काढला.

आता मुद्दा असा आहे कि फलज्योतिष हे विज्ञान नाही असे जागतिक वटहुकूम काढून जाहीर केले तरी पुढे काय? "या ज्योतिषाच काय करायच?" मधे हे आम्ही पुर्वीच लिहिले आहे.

No comments: