Wednesday, May 09, 2007

ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद


भाग १
कुंडली पंचांग राशी नक्षत्रे

१) फलज्योतिष म्हणजे काय़?२) पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?३) जन्मकुंडली म्हणजे काय?४) जन्मरास म्हणजे काय?जन्मनक्षत्र म्हणजे काय?५)नावावरुन रास कशी काढतात?६) प्रश्नकुंडली म्हणजे काय? ती मांडून उत्तरे कशी देतात?७) अमावास्या अशुभ दिवस आहे काय?८) अमावस्या, पौर्णिमेला शस्त्रक्रिया केल्यास रक्तप्रवाह जास्त होतो हे कितपत सत्य आहे?९) अमावस्या पोर्णिमेला वेडाचे झटके,अपघातचे प्रमाण जास्त का असते?१०) हिंदू धर्मात पावसाळ्यात जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो. असा अनुभव येतो.मग नक्षत्रे व मोसमी पाउस यांचा संबंध आहे का?११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातील सगळी गणिते बदलली का?१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का?

काही सामान्य शंका
१४) साडेसाती काय प्रकार आहे?१५) कालसर्प योग म्हणजे काय?१६) नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात?१७) ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?१८)ग्रहदशा अंतर्दशा हा काय प्रकार आहे?१९) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?२०) काही ज्योतिषी आयुष्यातील घटना अचूक सांगतात ते कसे?२१) हिरोशिमा व नागासाकि शहरात अणुबॉंब पडला त्यावेळी लाखो लोक मेले, विमान अपघात. रेल्वे दुर्घटना वा भुकंप या सारख्या घटनांमध्ये शेकडो लोक मरतात मग त्या सर्वांच्या कुंडल्यात काय एकाच वेळी मृत्युयोग होता असे म्हणायचे का?२२) ज्योतिषांवर दुटप्पीपणाचा आरोप केला जातो. ज्योतिषी लोक खरोखरच दुटप्पी आहेत का?२३) ग्रहांना दैवी शक्तीची प्रतिके मानून त्यांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत, डोळ्यांनान दिसणा-या परमेश्वराचे प्रतिक हवे म्हणून माणूस मुर्तीची स्थापना करतो व तिची आराधना करतो.तसेच ग्रहांच्या बाबतीत केले तर काय बिघडले?२४) ग्रहाची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?२५) ग्रहांचे खडे वापरल्याने अनिष्ट प्रभाव कमी करता येतात का?२६) प्रयत्नाने भविष्य बदलता येते का?

विवाह, पत्रिका आणि ज्योतिष
२७)पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?२८)विवाह जुळण्याचे वेळी पत्रिका बघावी का?२९)मंगळदोष म्हणजे काय?३०) एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?३१) मृत्यूषडाष्ट्क काय आहे?३२) मुहूर्त पाहणे योग्य कि अयोग्य?३३) गुरुबळ कशासाठी पहातात?३४) मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांती करावयास का सांगतात?३५) मूळ नक्षत्र सास-यास वाइट,आश्लेशा नक्षत्र सासूस वाइट असे म्हणतात ते कितपत बरोबर आहे?३६) सिंहस्थात विवाह करु नये असे का म्हणतात?३७) गुरु संततीकारक ग्रह का मानतात?

फलज्योतिषाच्या विविध पद्ध्ती
३८) मेदनिय ज्योतिष हा काय प्रकर आहे?३९) राजकिय भाकिते कशी वर्तवली जातात?४०) भुकंपाचे भाकित वर्तवता येणे शक्य आहे काय?४१)भृगूसंहिता हा काय प्रकार आहे?भृगूसंहितेमध्ये जगातल्या सर्वांच्या कुंडल्या सापडतात कशा?४२) नाडी म्हणजे काय? नाडी भविष्य हा फलज्योतिषाचा प्रकार आहे का?४३) दक्षिण भारतात केवळ तुमच्या अंगठ्याच्या ठशावरुन तुमचे नाव,तुमच्या बायकोचे नाव,तुमची कुंडली तुमचा वर्तमान काळ,भूत, भविष्य सर्व काही प्राचीन ऋषींनी लिहिलेल्या ताडपट्ट्यावर सापडती ते कसे? याविषयी विंग कमांडर शशीकांत ओक यांनी 'नाडी भविष्य एक चक्रावून टाकणारा चमत्कार' व 'बोध अंधश्रदधेचा' या पुस्तकात स्वतः अनुभव घेउन लिहिले आहे. ते काय खोटे?४४) नॉस्त्रॅडॅमस ने जगाच्या महत्वाच्या घडामोडींचे भाकिते पुर्वीच वर्तवून ठेवली आहेत. त्यात भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून जगभरात बलशाली राष्ट्र होइल असे म्हटले आहे.ते खरे आहे काय?४५) लोकमान्य टिळक यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास असून त्यांचा त्यावर विश्वास होता असे म्हणतात ते खरे का?४६) वास्तू ज्योतिष काय प्रकार आहे?

फल ज्योतिष शास्त्र? प्रवाद, समजुती
४७) फलज्योतिष हे शास्त्र आहे काय?४८) हे गोकॅलिन चे संशोधन नेमके काय आहे?४९) चंद्र सूर्याचा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून भरती ओहोटी हा दृष्य परिणाम होतोच ना! मग त्याचप्रमाणे ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण, चुंबकिय आकर्षण अशा शक्तींचा परिणाम आपल्यावर कशावरुन होत नसेल?५०) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित आहे का?५१) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित नाही तर वैद्न्यानिकांनी त्याविरोधी ठोस भुमिका का घेतली नाही?५२) जर ज्योतिष हे शास्त्र नाही तर वर्तमानपत्रे नियतकालिके राशी भविष्य का छापतात?५३) आमचा फलज्योतिषाचा अभ्यास नाही,तरी पण हे शास्त्र भ्रामक आहे हे आम्हास कसे कळावे?५४) राजकारणी, सिनेनट व्यावसयिक हे ज्योतिषाचा सल्ला घेतातच की?५५) लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरोपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का?५६) फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाइट काय?५७) मग ज्योतिषाकडे जाणा-या माणसाला तुम्ही काय पर्याय द्याल?५८) दोन तज्न्य डॉक्टरांची तरी कुठे एकसारखी मते असतात मग दोन ज्योतिषांची भाकिते सारखीच असली पाहिजेत असा आग्रह का५९) विद्न्यान तरी कुठे परिपूर्ण आहे? मग ज्योतिषशास्त्र तरी कसे परिपूर्ण असेल?६०) फल ज्योतिष विद्न्यान नसेना का पण उपयुक्त तर आहे?६१) अहो ज्योतिष विषय विद्यापीठात सुद्धा शिकवला जातो ते काय उगीच का?६२) परदेशातील फलज्योतिषसंशोधनाची उदाहरणे नेहमीच उगाळली जातात मग आपल्या कडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?६३) आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना काय आव्हाने दिली? ती कोणी स्वीकारली अगर कसे?

भाग दोन
स्फुट लेखन

फल ज्योतिषः एक प्राथमिक चिकित्सक दृष्टिकोण
नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष
फेंग शुई! वास्तुशास्त्राला चिनी चॅलेंज
यूजीसी आणि फलज्योतिष
फलज्योतिषचिकित्सेविषयी एरिक रेग यांनी संकलीत केलेले पाश्चिमात्य विचार
आखिल भारतीय ज्योतिषसंमेलन, सोलापूर २००१ च्या निमित्ताने

पुस्तक लेखमाला स्वरुपात वाचण्यासाठी शीर्षकावर टिचकी मारा.

2 comments:

प्रशांत said...

नमस्कार,
आपला अभिप्राय वाचला व नंतर तुमचं "ज्योतिष्याकडे जाण्यापूर्वी" हे पुस्तकही वाचलं. त्यात आपण व्यक्त केलेले विचार ध्यानात आले. तुमचा मुद्दा "फलज्योतिष हे शास्त्र आहे किंवा नाही?" एवढ्यावर मर्यादित नसून "फलज्योतिषाच्या आहारी जाणं योग्य आहे का?" ही त्यातील महत्त्व्याची बाब आहे हे लक्ष्यात आलं. फलज्योतिषच कशाला? कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाण्यानं नुकसानाव्यतिरिक्त हाती काहीही लागत नाही असे वाटते.
आता फलज्योतिषाबद्दल बोलण्यापूर्वी एक उदाहरण देऊ इच्छितो. नमूद केलेल्या उदाहरणात वैज्ञानिकांना किंवा विज्ञानाला आव्हान देण्याचा किंवा कुणाचा अपमान करण्याचा उद्देश नसून केवळ माझा मुद्दा मांडणे, हाच हेतू आहे. त्यामुळे, सर्वप्रथम सर्व थोर वैज्ञानिकांची क्षमा मागून मी सुरवात करतो.

विसाव्या शतकाच्या सुरवातीला आईन्स्टाईनच्या "Theory of Relativity"ने Classical Mechanics जवळ जवळ पूर्णत्वात आलं होतं. परंतु black-body radiation, Compton effect, इत्यादि बाबींचं आकलन classical mechanicsच्या आधाराने होऊ शकलं नाही. त्यातूनच Quantum Mechanicsचा जन्म झाला. त्यातील गृहितके आईन्स्टाईनसारख्या थोर वैज्ञानिकाला शेवटपर्यंत पटली नाहीत. "Quantum" हा शब्द आईन्स्टाईनच्याच लेखनात सर्वप्रथम आला हे विशेष! ती गृहितके एखाद्या सामान्य माणसाला समजावून सांगणं किती अवघड आहे हे वेगळं सांगायला नको. Quantum Mechanics शिकताना निदान सुरवातीला तरी विश्वास असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्यातील अर्थगर्भिता समजणार नाही. एखादी गोष्ट 'का घडते?' याचं उत्तर मिळणं कदाचित् अवचड असेल. परंतु ती गोष्ट 'कशी घडते?' याचं उत्तर शोधण्याचा ध्यासच Quantum Mechanics सारख्या विषयांना जन्म देत असतो. आता आईन्स्टाईनला Quantum Mechanics पटलं नाही म्हणून त्याला थोतांड म्हणायचं का? अर्थातच नाही. Quantum Mechanicsचा अभ्यास इतक्या वर्षांपासून अनेक शास्त्रज्ञ करत आहेत व त्या शस्त्राचा विकासही होतोय. 'आईन्स्टाईनने Quantum Mechanics नाकारले' या गोष्टीचा आज सामान्य मनुष्य गैरफायदा घेऊ शकत नाही, याचं कारण काय आहे? उत्तर अगदी सोपं आहे. विज्ञानातील एखाद्या शास्त्राबद्दल बोलण्यासाठी एक किमान पात्रता असावी लागते. ही पात्रता ठरवण्यासाठी सर्वमान्य निकष आहेत. दुर्दैवाने फलज्योतिष्याच्या बाबतीत कुठलेच निकष अस्तित्वात नाहीत. त्यामुळे 'एकवाक्यतेत अभाव' व तत्सम दोष या विषयाच्या वाङ्मयात आहेत. तसेच फलज्योतिषाच्या नावाखाली भोंदुगिरी, अंधश्रद्धा, इत्यादि क्षुद्र बाबींना आश्रय मिळतोय. या सर्व गोष्टींना आळा बसणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे, फलज्योतिषाचा सखोळ अभ्यास व्हावा असे वाटते.
आपल्या पुस्तकात बर्‍याच गोष्टींचा सखोलपणे उहापोह केला आहे. त्यात "ग्रहांची दृष्टी" हा मुद्द्यात त्रुटी आहेत, त्यांचा विचार करावा. पण खरोखर सर्वांनी जरूर वाचावं असं पुस्तक आहे. मी उदाहरणात मांडलेला मुद्दा तुम्हाला पटेल किंवा नाही हे मला माहिती नाही. पण त्यावर आपण विचार कराल अशी आशा आहे.

Anonymous said...

YA ASLYA CHARCHET KAHIHI ARTHA NAHI. MALA EK JYOTISHI MHANUN EKACH SANGAYACHA AAHE KI -----AAMHI JYOTISHI KUNAKADE KAHI PALKHI PATHAVAT NAHI ---KI KUNALA AGRAHACHA NIMANTRAN DET NAHI KI AAMCHYAKADE KUNDALI DAKHAVAYALA YA-----JYANNA YAYACHA AAHE TYANNI YAVE ---VAIDNYANIK DRUSHTIKON VALYANNI,, YA SAHASTRAVAR SHRADDHA NASLELYANNI KHADDHHYAT JAVE, VERY SIMPLE-------
JAYANT