Friday, September 18, 2009

ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड


ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड
फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्यांचे भारुड हे नावच इतके स्वयंस्पष्ट आहे कि लेखकाला नेमक काय म्हणायच आहे हे यातुन स्पष्ट होत. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर फलज्योतिष = लोकभ्रम + लबाडी+योगायोग+ इंट्युशन ग्रहतारे हे फक्त शोभेसाठी!
असे समीकरण मांडुन लेखकास काय सांगायच आहे याचे मुद्दे दिले आहेत. काही मुद्दे थोडक्यात असे आहेत.


*फलज्योतिष हे शास्त्र नसुन फक्त काल्पनिक ठोकताळ्यांचा संग्रह आहे.

*तारे व ग्रह यांचे परिणाम इथल्या सजीवसृष्टीवर होत असतील ही पण व्यक्तिश: प्रत्येक माणसाच्या नशीबावर त्याचे वेगळे परिणाम होतात असे मला वाटत नाही.

*कुंडलीत ग्रह कुठल्या स्थानात पडला आहे यावर ग्रहाचे फल अवलंबुन असते हा सिद्धांत भ्रममूलक आहे.

*अशा भ्रामक सिद्धांतावर आधारलेल्या ठोकताळ्यांची सुद्धा प्रत्यंतरे येउ शकतात. पण ती संभवनीयतेच्या नियमाप्रमाणे असतात.
पुस्तकात कुंडलीची प्राथमिक माहिती चित्रांद्वारे सुलभ केली आहे. फलज्योतिषाला विज्ञानबाह्य गृढ लहरींचे प्रभाव मानल्याशिवाय त्यातील सिद्धांतांची मांडणीच करता येत नाही. या प्रतिपादनावर आधारलेले विवेचन पुस्तकात वाचायला मिळते. भुपृष्ठाची वक्रता व कुंडलीतील स्थाने यांचा परस्पर संबंध दाखवताना ग्रह एकाच वेळी अनेक स्थानात कसा हजर असतो? हे आकृतीद्वारे दाखवले आहे.
स्थानांनुसार ग्रहांची फलिते बदलतात या सिद्धांतावर हल्ला चढवला आहे.ग्रहांची दृष्टी, ग्रहांच्या दशा व गोचरी या बाबत पुस्तकात विवेचन असुन या संकल्पनांवर हल्ला चढवला आहे.
लेखकाने आपल्यापुरता विचार मांडताना " भविष्य काळातील घटनांना आज कोणत्यातरी स्वरुपात अस्तित्व आहे कि नाही याचे उत्तर मला ठामपणे हो किंवा नाही असे देता येत नाही. जर त्या घटनांना तसे अस्तित्वच असेल तर भविष्य जाणणे या शव्दाला अर्थ रहात नाही" असे म्हटले आहे.
पुस्तकाच्या मुख पृष्ठावरील चित्रे पुरेसे सुचक असुन शीर्षकातील शास्त्र शव्दावर मारलेली रिक्त जागेची काट कल्पक आहे. मुखपृष्ठाच्या व मलपृष्टाच्या आतील बाजुस " गर्भ आपली वेळ स्वत:च ठरवतो काय?" "गोकॆलिन व फलज्योतिष" असा वेचक व लक्षवेधी मजकुर परिशिष्टासारखा टाकला आहे. मलपृष्ठावर " एक सोपा मार्ग" म्हणुन खालील आवाहन केले आहे. "फलज्योतिषाचा खरेखोटेपणा ज्यांना पडताळुन पहायचा आहे. त्यांना एक सोपा मार्ग उपलब्ध आहे.पन्नाशी गाठलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बर्‍या वाईट अशा निदान तीन-चार ठळक घटना घडलेल्या असतात. जर फलज्योतिष हे खरेखुरे शास्त्र असेल तर जन्मकुंडलीवरुन या घटना साधारणपणे वयाच्या कितव्या वर्षी घडल्या असाव्यात ते सांगता यायला पाह्जे.तुमच्या आयुष्यातल्या अशा २-३ घटना आठवा. त्यांच्या तारखा, निदान महिना, लिहुन ठेवा तुमची जन्मकुंडली आणि या घटनांचे स्वरुप एवढेच फक्त तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे अशा ज्योतिषाला द्या आणि त्या घटनांचे वर्ष कुंडलीवरुन सांगता येईल का विचारा. प्रत्यक्षात काय होते ते पहा. ' हा सुर्य हा जयद्रथ' या म्हणीचा अनुभव तुम्हाला येईल."

लेखक माधव रिसबुड हे निवृत्त डिव्हीजन फॉरेस्ट ऑफिसर होते. निवृत्ती नंतर त्यांनी फलज्योतिषाचा छंद जोपासला. रिसबुडांचा परिचय आपल्याला इथे पहाता येईल.त्यांचे २००३ मध्ये पुणे येथे निधन झाले.
पुस्तक बाजारात फुटपाथवर मिळणार्‍या अनमोल खजान्यातच कदाचित मिळु शकेल.आंतरजालावर भटकणा‍र्‍या वाचकांना मात्र ते इथे ते वाचता येईल.
लेखक मुद्रक प्रकाशक:- माधव रिसबूड; २ वासवी, २१०१ सदाशिव पेठ, पुणे ३०
पृष्टसंख्या- ३०
मुल्य १० रु ; प्रकाशन :- जुलै १९९७

1 comment:

PRABHAKAR said...

sir, फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड Ya pustkachi pdf file aasel tar mala patau shakal ka?
maza email id det aahe
prabhakar.bhosale@gmail.com